महागाईचा भडका सतत उडत असताना आता एक दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. सणासुदीच्या या काळात तुमच्या खिशाला थोडासा कमी भार पडणार आहे. कारण पेट्रोल- डिझेलचे दर कमी होण्याचे संकेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्या सरकारने दिले आहे. पेट्रोल आणि डिझेलवर असणारे व्हॅटचे दर कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्थातच पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार असे वाटत आहे.
पेट्रोल-डिझेलचे दर कमी करावेत यासाठी तीन प्रस्ताव हे राज्यसरकारकडे आलेले आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्यात राज्यसरकारच्या तिजोरीवर चांगलाच बोजा वाढणार आहे. या तीन प्रस्तावांमध्ये उर्वरित महाराष्ट्राप्रमाणे मुंबई, नवी मुंबई, ठाणे या महापालिका क्षेत्रांत व्हॅट आकारणे, संपूर्ण महाराष्ट्रात एकच ‘रेव्हन्यू न्यूट्रल वन रेट’ लागू करणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबईत जो दर लागू आहे, तो दर एमएमआरडीए क्षेत्रात लागू करणे असे तीन प्रस्ताव आहेत.
पेट्रोल-डिझेल दरवाढीचा फटका हा कायम निवडणुकीवर परिणाम करत असतो. अशावेळी अगदी तोडांवर आलेल्या निवडणुकीमुळे पेट्रोल- डिझेल दरवाढ ही नक्कीच परिणाम करणारी असणार आहे. आता या सगळ्यामुळे दर कमी झाले तर त्याचा फायदा नागरिकांना होणार हे नक्की!