जर तुम्ही दूध पित असाल तर तुमच्यासाठी ही माहिती फारच महत्वाची ठरणार आहे. पूर्णान्न असलेले दूध हे जास्त पिणेही आरोग्यासाठी हानिकारक ठरते हे तुम्हाला माहीत आहे का? तर ही माहिती तुम्ही वाचायलाच हवी. दुधामध्ये कॅल्शिअम, हेल्दी फॅट, पोटॅशिअम, व्हिटॅमिन D, फॉस्फरस हे घटक असतात. त्यामुळे दूध सगळ्यांना प्यावे असा सल्ला दिला जातो. पण नुकत्यात झालेल्या एका प्रयोगात दूध जास्त पिणेही आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे समोर आले आहे.
दूध हे पचनाला कठीण असते. जर तुम्ही दोन कपपेक्षा अधिक दूध पित असाल तर त्यामुळे पोटाच्या समस्या जाणवू शकतात. दूध प्यायल्यानंतर अनेक वेळा पोट फुगणे, गॅस होणे अशा समस्या जाणवू लागतात. दूध अति प्रमाणात प्यायल्यामुळे थकवा येतो. कारण दूध पचण्यासाठी शरीरातील उर्जा खर्च होते. त्यामुळे जास्त दूध पिणे हे हानिकारक असते.
दूधामध्ये लॅक्टोझचे प्रमाणही जास्त असते. त्यामुळे त्वचेच्या व्याधीही अनेकांना होऊ लागल्याचे निदर्शनास आले आहे. दूधाच्या अतिसेवनामुळे पिंपल्स येणे, त्वचा लाल पडणे त्याला खाज येणे असे देखील त्रास होताना दिसले आहे. जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर तुम्ही दूधाचे सेवन करताना विचार करायला हवा.
हल्ली गायींना दूध जास्ती येण्यासाठी गायींनी इंजेक्शन दिले जाते. त्यामुळे गायींना दूध तर जास्त येते. पण त्यामध्ये हार्मोन्सचे प्रमाण वाढलेले असते. असे दूध प्यायल्यामुळे हार्मोन्सचे संतुलन बिघडते.
एका सर्वेक्षणात असेही दिसून आले आहे की, अति दूध प्यायल्यामुळे स्मरणशक्ती कमी होते. अति दूधाच्या सेवनामुळे मेंदूची गति कमी होते.