मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत 2023 याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. येत्या 30 डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी केल्या जाणाऱ्या पुजेला प्रारंभ होणार आहे. हिंदू धर्मामध्ये या व्रताचे अनन्यसाधारण असे महत्व आहे. अनेक महिला दरवर्षी न चुकता हे व्रत करतात. करायला सोपं असं हे व्रत आहे. पण या व्रतानंतर मिळणारी आत्म:शांती ही देखील तितकीच महत्वाची आहे. गुरुवार हा लक्ष्मीच्या उपासनेचा दिवस आहे. लक्ष्मीचा वास असतानाही माणसाने कसे असावे हे सांगणारे हे व्रत खूपच फायद्याचे ठरते. त्यामुळेच या व्रताची अधिक माहिती आज आपण घेणार आहोत.
वाचा : मार्गशीर्ष गुरुवार कथा | Margshish Guruvar Katha 2023
असा करा पुजाविधी
महालक्ष्मी व्रत घरच्या घरी करणे फार सोपे आहे. साधारण 5 गुरुवारनंतर या व्रताचे उद्यापन करायचे असते.
- १. व्रत हे अगदी कोणत्याही वेळी केले तरी चालते. तुम्ही जर कामासाठी बाहेर जाणार असाल तर तुम्हाला जसा वेळ मिळेल तसे हे व्रत करा.
- पुजाविधीसाठी लागणारे साहित्य जसे की नारळ, तांब्याची पुजेची भांडी, वेणी, कोणतीही पाच फळ, पाच पाने गंध फुल, अगरबत्ती इ.
- ही पुजा अगदी व्यवस्थित पाटावर मांडावी. सगळ्यात आधी मुठभऱ तांदुळ घेऊन मग त्यावर नारळ बसलेला करा ठेवावा.
- लक्ष्मीची मूर्ती असल्यास ती देखील ठेवावी. संपूर्ण पूजा मांडल्यानंतर मग वर दिलेली कथा वाचावी. मनोभावे कथा वाचून देवीला नैवेद्य दाखवावा.
पूजा झाल्यानंतर तुमच्या सवडीनुसार त्याचे उद्यापन करावे. यातील नारळ आणि तांदुळ पुन्हा भरुन ठेवावे. फुलं आणि कऱ्हातील पाणी हे झाडांना टाकावे. फळ खावीत. पुजेतील एकही साहित्य वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी. तरच ती खऱ्या अर्थाने पूजा असते.
आता तुम्हीही हे व्रत करायला अजिबात विसरु नका.