मंगल प्रभात लोढामंगल प्रभात लोढा

Mangal Prabhat Lodha | कॅबिनेट मंत्री आणि मलबार हिल मतदारसंघाचे आमदार मंगल प्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे, मलबार हिल येथील जलाशयाच्या पुनर्बांधणीबाबत आवश्यक कार्यवाही करण्याची विनंती केली आहे. त्याचबरोबर त्यांनी महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांना देखील पत्र लिहून नागरिकांच्या समस्या मांडल्या आहेत आणि त्याबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्वरित निर्णय घ्यावा असे सुचवले आहे.गेल्यावर्षी मुंबई महापालिकेने मलबार हिल येथील जलाशयाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावानुसार जलाशयाच्या पुनर्बांधणीसाठी 389 झाडांची कत्तल करावी लागणार असल्याने नागरिकांनी त्याचा विरोध केला.

पुनर्बांधणी ऐवजी दुरुस्ती शक्य आहे

लोकप्रतिनिधी या नात्याने मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महापालिका अधिकारी आणि नागरिकांना चर्चेसाठी एकत्र आणले. वेळोवेळी बैठकांचे आयोजन करून पुनर्बांधणीच्या मुद्द्यावर सुवर्ण मध्य काढण्यासाठी प्रत्येकाला मत मांडण्याची संधी दिली.मंत्री मंगलप्रभात लोढा, पत्रात म्हणाले आहेत की या समितीने जलाशयाची दोनवेळा पाहणी केली असून, पुनर्बांधणी ऐवजी दुरुस्ती शक्य आहे, असा अहवाल सादर केला आहे. परंतु यावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेला यश आलेले नाही. निर्णय घेण्यासाठी वेळ लागत असल्याने नागरिकांच्या समस्येत वाढ होत आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन आपण संबंधितांना योग्य निर्देश द्यावेत, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना केली.

या बैठकीतील झालेल्या चर्चांच्या अनुषंगाने या विषयावर तोडगा काढण्यासाठी तज्ज्ञांची समिती गठीत केली गेली. या समितीमध्ये स्थानिक नागरिक, या विषयातील तज्ज्ञ व्यक्ती, आयआयटीमधील तज्ज्ञ आणि महापालिकेचे अधिकारी समाविष्ट होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *