फेसबुक लाईव्हवर केली हत्या

Abhishek Ghosalkar वर फेसबुक लाईव्हवर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना 8 फेब्रुवारी 2024 रोजी घडली. या घटनेला आता महिना पूर्ण झाला आहे. घोसाळकर यांच्यावर मॉरिस यांनी गोळ्या झाडल्या हे सगळ्यांनीच पाहिले.त्यानंतर त्याने स्वत:लाही मारुन घेतले. त्याने ज्या बंदूकीने त्याने घोसाळकरला मारले त्याच बंदुकीने त्याने स्वत:ला मारुन घेतले. ही बंदूक कोणाची? कशी आली असा शोध सुरु असताना त्यात मॉरिसच्या बॉडीगार्डचे नाव समोर आले. यात मॉरिसचा बॉडीगार्ड अजूनही अडचणीत आहे. त्याने केलेला जामीन अर्ज हा नुकताच फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे अद्याप तरी त्याची सुटका नाही असे दिसत आहे.

अमरेंद्रचा जामीन फेटाळला Abhishek Ghosalkar

मॉरिसने ज्यावेळी गोळ्या झाडल्या त्यावेळी एकच गोंधळ उडाला होता. त्यानंतर मॉरिसनेही स्वत:वर गोळ्या झाडून घेतल्या. त्याच्याकडे असलेली बंदूक ही महागडी असल्याचे नंतर तपासात समजले. ही बंदूक त्याच्या बॉडीगार्डची असल्याची माहिती समोर आली आहे. अमरेंद्रचा बॉडीगार्ड याचा यात प्रत्यक्ष सहभाग होता की नाही याचा अद्याप तपास सुरु आहे. त्यामुळे अमरेंद्रची यातून सुटका झालेली नाही. हे प्रकरण उघड उघड असताना अमरेंद्रला जामीन मिळावा यासाठी अर्ज करण्यात आला होता. पण सत्र न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळला आहे.

Abhishek Ghosalkar | … या कारणामुळे मॉरिसने झाडल्या गोळ्या

नेमकं प्रकरण काय?

८ फेब्रुवारी 2024 रोजी मॉरिसने, अभिषेक घोसाळकर याला मागील सगळे काही विसरुन फेसबुक लाईव्ह करायला बोलावले. अभिषेकही मैत्रीचा हात पाहून मॉरिसच्या ऑफिसमध्ये गेला. मॉरिसच्या विरोधात त्याने गेल्यावेळी साक्ष दिल्यामुळे त्याला तुरुंगवास झाला असे मॉरिसला वाटत होते. तो त्याचा घात करणार असे अनेकांना वाटले होते. पण मैत्री केल्यामुळे तो मागचे विसरला असे सगळ्यांना वाटले. तोच विश्वास संपादन करुन त्याने त्याला फेसबुकवर लाईव्ह केले आणि त्याच लाईव्हमध्ये त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर स्वत:वर गोळ्या झाडून घेतल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *