मलायका अरोरा वयाच्या 50 व्या वर्षीही कमालीची आकर्षक आणि सुंदर दिसते. 21 वर्षाच्या मुलाची मलायका आई आहे असं कोणालाही वाटणार नाही. मलायकाने नुकतेच आपल्या सोशल मीडियावर कर्व्ही फिगरमधील काही फोटो शेअर करत पुन्हा एकदा चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.
मलायकाने व्हाईट बॉडीकॉन ड्रेस घातला असून एका बाजूने या हात ओपन असून दुसऱ्या बाजूने फुल हँड असल्याचे दिसून येत आहे. पार्टीसाठी परफेक्ट स्टाईल करायची असेल तर मलायकाच्या या लुकवरून नक्कीच प्रेरणा घेता येईल पाहा मलायकाच्या कातिलाना अदा. (फोटो सौजन्य – Instagram)
मलायकाने फिटेड बॉडीकॉन ड्रेस घातला असून तिचे वयदेखील या ड्रेसमध्ये लपत आहे. योगा करून वयाच्या 50 व्या वर्षीही मलायका तरूण अभिनेत्रींना टक्कर देत आहे. या ड्रेससह मलायकाने हाय बन हेअरस्टाईल केली असून कर्व्ही फिगर दाखवली आहे. मलायका अत्यंत स्टनिंग, बोल्ड आणि ब्युटीफुल दिसत आहे.मलायकाने यासह कानातले आणि अंगठी इतकेच मिनिमल दागिने कॅरी करत परफेक्ट पार्टी स्टाईल केली आहे. तिचा हा स्टायलिश व्हाईट गाऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतोय. मलायकाचा हा लुक एखाद्या ग्रीक गॉडेससारखा दिसत आहे. तुम्हालाही मलायकासारखे फिट दिसायचे असेल तर तिच्या या लुकवरून नक्कीच प्रेरणा घेता येईल. मलायकाने हा लुक पूर्ण करताना ग्लॉसी मेकअप केला आहे. काजळ, आयलायनर, डार्क आयशॅडो, हायलायटर, डार्क आयब्रो आणि ग्लॉसी लिपस्टिक लावत तिने हा लुक पूर्ण केलाय.