Banana Farming | शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता ! जळगांव जिल्ह्यात 274 गावांतील 15 हजार 663 शेतकऱ्यांच्या केळी पीकांचे सन 2022 मध्ये सी.एम.व्ही. (कुकुंबर मोझंक व्हायरस) या रोगामुळे नुकसान झाले होते. नुकसानापोटी 19 कोटी 73 लक्ष रुपये एवढ्या मदतीचे वितरण करण्याचे आदेश मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिले आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच काढण्यात आला आहे. (कुकुंबर मोझॅक व्हायरस) या रोगामुळे ‘केळी’ या बहुवार्षिक पिकांच्या नुकसानासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पहिल्यांदाच अशा प्रकारची मदत देण्यात आलेली आहे, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.
मदत व पुर्नवसन मंत्री अनिल पाटील म्हणाले की, तत्कालीन वादळी पावसाच्या तडाख्याने केळीबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते आणि शेतकऱ्यांनी नवीन लागवड केलेल्या केळीबागांवर व्हायरसचे नवीन संकट आले होते. या रोगामुळे बाधित झालेले एकूण क्षेत्र 8771 हेक्टर एवढे होते. जिल्ह्यातील सर्व बाधित शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादेचा निकष पाळून 27 मार्च 2023 रोजीच्या शासन निर्णयातील सुधारित दर व निकषांप्रमाणे एकूण 19 कोटी ७३ लक्ष एवढी मदत देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना यातून दिलासा मिळेल, असेही मंत्री पाटील म्हणाले