सिद्धार्थ जाधवला मिळाली इंडिगोकडून बॅगसिद्धार्थ जाधवला मिळाली इंडिगोकडून बॅग

Indigo Airline संदर्भात अभिनेता सिद्धार्थ जाधवने काल एक ट्विट करत तक्रार केली होती. त्यानंतर आज Indigo Airline ने सिद्धार्थची नुकसान भरपाई केली आहे. याची माहिती स्वत: सिद्धार्थने ट्विट करत दिली आहे. मुंबई ते गोवा प्रवासादरम्यान एअरलाईन्सकडून त्याच्या लगेजचे नुकसान करण्यात झाले होते. त्यामुळे संतापलेल्या सिद्धार्थला ट्विट करावे लागले. परंतु परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत एअरलाईन्सने सिद्धार्थला त्याची बॅग परत केली आहे.

Indigo Airline वर का संतापला अभिनेता सिद्धार्थ जाधव

लगेजचे झाले नुकसान

सिद्धार्थन इंडिगो एअरलाईन्सने मुंबई ते गोवा असा प्रवास करत होता. या प्रवासादरम्यान त्याची लगेज बॅग ज्यावेळी त्याला मिळाली ती बॅग तुटली होती. बॅगेसोबत जे झाले ते पाहून त्याने इंडिगोला टॅग करत एक व्हिडिओ केला. त्यानंतर Indigo Airline ने त्या व्हिडिओची दखल घेत त्याची नुकसान भरपाई केली आहे. त्याला एअरलाईनकडून एक नवी कोरी बॅग देण्यात आली. ज्याचे आभार माननणारा व्हिडिओ देखील त्याने शेअर केला आहे.

एअरलाईन्सकडून अनेकदा लगेज हाताळताना नुकसान होत असते. त्यांच्याकडून त्वरीत काळजी देखील घेतली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *