Indian Food घरातील घरगुती जेवणाचा कंटाळा आला की काही चमचमीत पदार्थ खाण्याची आपल्याला खूप इच्छा होते. असे चमचमीत पदार्थ हे जीभेचे चोचले पुरवत असले तरी देखील ते आरोग्यास हानिकारक ठरतात हे अभ्यासांती समोर आले आहे. यात जंकफूडचा समावेश नाही तर असे काही खाद्यपदार्थ आहेत जे तुम्ही कदाचित रोज खात असाल तुम्हाला थोडी काळजी घेण्याची गरज आहे. एका संशोधनातून या गोष्टी समोर आल्या आहेत. नेमके कोणते पदार्थ तुम्ही टाळायला हवेत. चला जाणून घेऊया याची एक विस्तृत माहिती
चमचमीत पदार्थ अधिक घातक Indian Food

आपल्याकडे मिळणारे छोले भटूरे, दाल मखनी, बटर चिकन सारखे पदार्थ हे अधिक चविष्ट असतात. यामध्ये विविध मसाल्यांचा वापर केला जातो. एकाहून अधिक मसाले याला अधिक चमचमीत करण्याचे काम करतात. म्हणूनच हे पदार्थ खाण्याची आपल्याला इच्छा होते. परंतु अस पदार्थ अधिक चमचमीत करण्यामागे त्यात असलेले अति मिठाचे प्रमाण त्रासदायक ठरणारे असते. या पदार्थांची चव वाढवण्यासाठी यात मोठ्याप्रमाणात सोडिअमचे घटक असलेले पदार्थ असतात. इतकेच नाही तर यामध्ये तेलाचाही अधिक प्रमाणात वापर होत असतो. त्यानेच याची चव वाढत असते. पण असे अति घटक हे ह्दयरोगाशी, यकृतासंदर्भात रोगाशी संबधित असतात. त्यामुळेच हे पदार्थ प्रमाणात खायला हवे.
मसाल्यांचे अधिक सेवन घातक
एखाद्या पदार्थांमध्ये खूप जास्त प्रमाणात मसाले घातले जात असेल तर असे मसाले पदार्थाची चव नक्कीच वाढवू शकतात. यात कोणतीही शंका नाही. परंतु असे मसाले पोटाच्या आरोग्यासाठी घातक ठरतात. मसाले पचवणे हे देखील शरीरासाठी कठीण असे काम आहे. जर एकहून अधिक मसाले वापरले जात असतील तर त्यामुळे पोटाच्या समस्याही उद्भवू शकतात.
तेलाचा वापर
जे पदार्थ आपल्याला अधिक चमचमीत लागतात अशा पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात तेलाचा वापर केला जातो. तेलाचा असा अधिक वापर आपल्याला सुरुवातीला जाणवत नाही. परंतु त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास सुरु होतो. त्याचसोबत वजनवाढीचा त्रासही होऊ लागतो. असे पदार्थ सतत खाल्ले गेले तर त्वचेच्या समस्याही आपल्याला उद्धभवू शकतात.
म्हणूनच आपल्या देशातील असे चमचमीत पदार्थ प्रमाणात खाणे केव्हाही चांगले.