Alum For Dark Underarms

उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी बहुतेक लोक त्यांच्या वॉर्डरोबमध्ये स्लीव्हलेस कपड्यांचा समावेश करतात. परंतु अंडरआर्म्समध्ये वाढणारा काळेपणा आपल्याला असे कपडे घालण्यापासून रोखतो. अनेकदा संकोचामुळे उन्हाळ्यातही पूर्ण कपडे घालावे लागतात. यापासून सुटका मिळवण्यासाठी लोक अनेक प्रकारचे स्क्रब, ब्लीच आणि मॉइश्चरायझर वापरतात. पण केमिकलचा अतिरेकी वापर त्वचेशी संबंधित समस्या वाढवण्याचे कारण असल्याचे सिद्ध होते. 

हे टाळण्यासाठी तुरटीचा वापर केल्याने त्वचेचा काळेपणा तर दूर होतोच शिवाय त्वचेवरील रसायनांच्या दुष्परिणामांचा धोकाही कमी होतो. अंडरआर्म्सचा काळेपणा दूर करण्यासाठी तुरटीचा स्प्रे कसा बनवायचा ते जाणून घेऊया. स्टेप्ससह फायदे या लेखातून जाणून घ्या. (फोटो सौजन्य – iStock) 

अंडरआर्म्समध्ये काळपटपणा का वाढतो?

नॅशनल इन्स्टिट्यूटनुसार, 7 ते 74 टक्के लोकांना काळ्या काखेचा सामना करावा लागतो. या स्थितीला ॲकॅन्थोसिस निग्रिकन म्हणतात. याविषयी बोलताना त्वचारोगतज्ज्ञ डॉ. नवराज विर्क यांनी सांगितले की, ॲकॅन्थोसिस निग्रिकनमुळे त्वचा जाड आणि काळी पडू लागते. त्यामुळे त्वचेच्या दुमड्यांना त्रास होऊ लागतो. विशेषतः अंडरआर्म, कोपर, गुडघे आणि मानेवर काळेपणा वाढतो.

काखेतील काळेपणा करा दूर

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थच्या म्हणण्यानुसार, त्वचेचा काळेपणा घालविण्यासह तुरटीचा वापर त्वचेच्या एक्सफोलिएशनमध्ये आणि छिद्रांना घट्ट करण्यासाठी देखील प्रभावी ठरतो. यामुळे मुरुमांच्या खुणाही कमी होतात. तुरटी हे एक रासायनिक संयुग आहे, जे सल्फेट आणि पाण्याच्या रेणूपासून तयार केले जाते. त्वचा उजळवण्याच्या गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या तुरटीचा वापर केल्याने त्वचेवर वाढणारे फ्रिकल्स, एक्ने आणि ब्लॅक हेड्सच्या समस्या दूर होतात.

(वाचा – Hair Care | केस होतील अधिक चमकदार आणि मजबूत, DIY कडिपत्ता आणि बीटचे हेअर मास्क)

एक्सफोलिएटिंग गुणधर्मांनी समृद्ध

तुरटीच्या स्प्रे चा नियमित वापर केल्यास त्वचेतील मृत पेशींची समस्या दूर होऊ शकते. त्यामुळे त्वचेचा काळेपणा हळूहळू कमी होऊ लागतो. तसंच काळ्या अंडरआर्म्सवर तुरटीचा स्प्रे मारल्याने बॅक्टेरियाच्या संसर्गाचा धोका कमी होतो.

दुर्गंधी आणि घाम येण्यापासून अंडरआर्म्सचे संरक्षण 

तुरटीमध्ये असलेले डिओड्रंट आणि अँटीपर्स्पिरंट गुणधर्म बॅक्टेरिया काढून घाम कमी करण्यास मदत करतात. तुमच्या ब्युटी रुटीनमध्ये तुरटीचा समावेश केल्याने शरीराची दुर्गंधी दूर होते. काखेवर लावल्याने घामाच्या ग्रंथी आकुंचन पावू लागतात, ज्यामुळे त्वचेला जास्त घाम येण्याच्या समस्येपासून आराम मिळतो. तुरटीपासून तयार करण्यात आलेल्या या स्प्रे चा वापर दिवसातून दोनदा करावा. यामुळे त्वचा टवटवीत राहते.

(वाचा – Beard Growth Tips | दाढी वाढविण्यासाठी किचनमधील हा मसाला ठरेल रामबाण, लिंबासह करा वापर)

अंडरआर्म्ससाठी तुरटीचा स्प्रे कसे तयार करावे

  • तुरटीचा स्प्रे तयार करण्यासाठी, 2 चमचे कोरफड जेल, 1 चमचा तुरटी पावडरमध्ये घाला आणि चांगले मिसळा
  • घट्ट मिश्रण तयार झाल्यावर त्यात अर्धा ग्लास गुलाबपाणी टाकून मिक्स करून घ्या
  • तयार मिश्रण एका ग्लासमध्ये काढल्यानंतर त्यात 1 चमचा बेकिंग सोडा टाकून द्रव तयार करा
  • पांढरा स्प्रे तयार झाल्यानंतर, स्प्रे बाटलीत ठेवा आणि अंडरआर्म्सवर स्प्रे चा वापर करा

असा करा वापर 

How To Use Fitkari Spray: आंघोळीपूर्वी अंडरआर्म्सवर तुरटीचा स्प्रे लावा आणि 10 ते 15 मिनिटे राहू द्या. त्यानंतर साध्या पाण्याने त्वचा स्वच्छ करा. हे दिवसातून दोन ते तीन वेळा वापरता येऊ शकते. यामुळे त्वचा उजळण्यास मदत होते आणि त्वचा रसायनांच्या प्रभावापासून मुक्त होते.

या गोष्टींची काळजी घ्या

  • परफ्यूम थेट त्वचेवर लावणे टाळा. त्यामुळे त्वचेच्या टोनवर परिणाम होऊ लागतो
  • स्वच्छतेची काळजी घ्या आणि नैसर्गिक उत्पादनांच्या मदतीने अंडरआर्म्स नियमितपणे स्वच्छ करा
  • कडक सूर्यप्रकाशात बाहेर जाण्यापूर्वी आपले हात झाकून ठेवा. अन्यथा टॅनिंग होण्याचा धोका तसाच राहातो 
  • याशिवाय वारंवार शेव्हिंग, वॅक्सिंग आणि हेअर रिमूव्हल क्रीम वापरल्याने त्वचेवरील काळेपणा वाढू शकतो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *