Marathi Horoscope (Rashi Bhavishya)- मंडळी, ज्योतिष तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार येत्या ७ जून २०२४ पासून ३ भाग्यवान राशींचे भाग्य उजळणार आहे. येत्या ७ जूनला शुक्र ग्रह मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करणार असून या परिवर्तनामुळे काही विशिष्ट राशींची भाग्योदय होण्याची शक्यता दिसून येत आहे. शुक्राच्या या नक्षत्र प्रवेशामुळे १२ राशींपैकी ३ राशींना धनलाभ, मन:शांती, कामाच्या ठिकाणी यश अशा अनेक प्रकारचे लाभ होणार असल्याचं भाकित ज्योतिष शास्त्रज्ञांनी वर्तवले आहे. चला तर मग जाणून घेऊयात, कोणत्या आहेत त्या ३ भाग्यवान राशी…

या ३ राशींचे उजळणार भाग्य

मिथुन : मिथुन राशीच्या लोकांना या काळात नवा Income Source सापडणार असून यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. जर मिथुन राशीचे लोक नवीन वाहन खरेदी करण्याचा बेत करत असतील तर ७ जून नंतरचा काळ त्यांच्यासाठी उत्तम असल्याचं म्हटलं जात आहे. नोकरदार वर्गालाही कामाच्या ठिकाणी प्रगती साधण्यासाठी हा काळ लाभदायक असणार आहे. मिथुन राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवनमान या काळात अधिक चांगले होण्याची चिन्हं दिसत आहेत.

कन्या : शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनामुळे कन्या राशीच्या लोकांनाही लाभ होणार आहे. या राशीतील लोकांना वडीलोपार्जित धन प्राप्त होण्याची शक्यता आहे. नवीन घर किंवा त्यासंबंधी कामाला चालना मिळेल. या काळात कन्या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होण्याचे देखील चान्सेस आहेत.

कुंभ : तिसरी रास आहे कुंभ रास. ७ जून नंतर या राशीच्या लोकांचा भाग्योदय निश्चित आहे. व्यावसायिकांसाठी हा काळ लाभदायक राहणार असून, आर्थिक उलाढालींमधून धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी पगारवाढीची तसेच प्रमोशनची संधी चालून येण्याची दाट शक्यता आहे. तसेच कुंभ राशीतील विवाह इच्छुकांसाठी देखील हा काळ लाभदायक ठरू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *