गोविंदाने केला शिवसेनेत प्रवेशगोविंदाने केला शिवसेनेत प्रवेश

लोकसभेच्या रणधुमाळीत आता आणखी एका गोष्टीने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. बॉलिवूडस्टार गोविंदा अहुजा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्ष कार्यालय बाळासाहेब भवन येथे पार पडलेल्या कार्यक्रमात गोविंदा यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. सरकारची कामे गोविंदा जनतेपर्यंत पोहोचवतील. ज्यातून महायुतीला फायदा होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवजयंतीच्या पवित्र दिनी सगळ्यांचे लाडके अभिनेते गोविंदा जी यांचे शिवसेनेत मनापासून स्वागत करतो. सगळ्याच समाजात ते लोकप्रिय असून विनम्र असलेले गोविंदा जी यांचे शिवसेना पक्षात स्वागत करतो आणि शुभेच्छा देतो.
गोविंदा यांनी मुंबईतील सकारात्मक बदलांबाबत समाधान व्यक्त केले. सर्वच क्षेत्रात एक सकारात्मकता आणि समृद्धी दिसून येत आहे. मुंबईतील विकास कामांनी प्रभावित होऊन ते आपल्या सोबत आले आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. नकारात्मकता दूर झाली आणि सकारात्मकता तयार झाली. कामे सुरु झाली आणि अर्थचक्राला चालना मिळाली. हे सरकार विकासाचे व्हिजन हाती घेऊन काम करणारे आहे. घरात बसून काम करणारे नाही तर रस्त्यावर उतरुन काम करणारे हे सरकार आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.


आम्ही महायुती म्हणून 48 जागा लढवत असून जास्तीत जास्त जागा जिंकणार आहोत. मागील दीड पाऊणेदोन वर्षात सरकारने केलेली कामे लोकांनी पाहिली आहेत. समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी सरकारने काम केले आहे. महायुतीचे सरकार येण्यापूर्वी राज्यात सण उत्सव बंद होते. महायुतीचे सरकार आल्यानंतर पहिला सण दहिहंडी अर्थात गोविंदा होता. आज गोविंदा आपल्यात आला आहे हा देखील योगायोग आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *