उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समितीत समावेश कराउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समितीत समावेश करा

#Dhangaraarakshan चा लढा सुरु ठेवताना शक्तप्रदत्त समितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश करावा अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. राज्यभरात झालेल्या उपोषणांनंतर आपल्या महायुती सरकारने आरक्षण अंमलबाजवणीसाठी पुढाकार घेतला. पडाळकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘धनगर शक्तिप्रदत्त समिती’ बनत आहे. ती प्रभावीपणे काम करेल याची त्यांना आशा आहे. मात्र, ज्यांनी धनगर आरक्षणासाठी प्रामाणिक काम केले अशा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाच या समितीत स्थान नाही. अशी खंत गोपीचंद पडाळकर यांनी बोलून दाखवली आहे. समितीत देवेंद्र फडणवीस यांना स्थान देण्यात यावे ही भावना समस्त समाजाची आहे. असे निवेदनाद्वारे पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे.

ते पुढे म्हणाले की, आदिवासींना ते धनगरांना ही मुळात संकल्पनाच देवेंद्र फडणवीसांची. मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात धनगरच ‘धनगड’ असल्याचे प्रतिज्ञापत्र दिले. योजनांपासून ते आरक्षण अंमलबजावणीपर्यंत सर्व प्रक्रियेत देवेंद्र फडणवीस साहेबांचे मोठे योगदान आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा यात समावेश करावा. ही मागणी पडळकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *