भांडगाव येथील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याप्रकरणी ग्रामस्थांनी इंदापूर तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढला आहे. येथील रामोशी बांधवांनी हा मोर्चा काढला असून जय मल्हार कांती समितीचे अध्यक्ष दौलतनाना शितोळे (Daulat Nana Shitole )यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. रामोशी समाजातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला होता. या मुलीने तक्रार केली तर तिचे नुकसान केले जाईल अशी धमकी दिल्यामुळे त्या मुलीला त्या इसमाविरोधात तक्रार करणे शक्य होत नव्हते. असे देखील शितोळे यांनी सांगितले.
मतदानाच्यावेळी मतदार म्हणून या समाजाला पाहिले जाते. पण त्यांच्या समस्या या जाणून घेतल्या जात नाही. अशा प्रकारचा गुन्हा करुन जर तक्रार करण्यासही भीति असेल तर त्याला काय अर्थ? पोलिसांनी चार्जशीट दाखल करताना ती अत्यंत योग्य आणि व्यवस्थितपणे केली पाहिजे. गुन्हेगाराला शिक्षा व्हायला पाहिजे. आता ही परिस्थिती आहे की, गुन्हेगार गुन्हा करुनही समोरच्या मुलीला पैशाचे आमिष देऊन त्याचे नाव काढून टाकण्यास सांगत आहे. अशा प्रकारची परिस्थिती असेल तर त्याला आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊन असे दौलतनाना शितोळे यांनी सांगितले.