Gopichand Padalkar गेल्या काही महिन्यांपासून #dhangaraarakshan चा मुद्दा आमदार गोपीचंद पडळकर यांनी लावून धरला आहे. धनगर समाजाच्या विकासासाठी त्यांना आरक्षण मिळावे यासाठी आतापर्यंत अनेक आंदोलने करण्यात आली आहेत. महाराष्ट्र सरकारकडून 50 दिवसात आरक्षणासंदर्भात निकाल लागणे गरजेचे होते. पण तसे झालेले नाही. सरकारला पुन्हा एकदा आठवण करुन देण्यासाठी आणि आपला हक्क मिळवण्यासाठी शांततेने आंदोलन करण्याचे आवाहन गोपीचंद पडळकर यांनी नुकतेच केले आहे.
स्वत: पडळकर मुंबई येथील तहसील कार्यालयात जाऊन निवेदन देणार आहे. धनगर समाज जिथे जिथे आहे तिथे तिथे त्यांनी तहसील कार्यालय किंवा जिल्हा कार्यालयात जाऊन आपले निवेदन द्यावे असे सांगितले आहे. उद्या मंगळवार 21 नोव्हेंबर रोजी हे आंदोलन करण्यात यावे असे देखील Gopichand Padalkar यांनी सांगितले आहे. या साठी समाजातील अधिकाधिक लोकांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.