वीगमधून महिला बाळगत होती ड्रग्जवीगमधून महिला बाळगत होती ड्रग्ज

इअर एंडच्या निमित्ताने देशभरात अनेक ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन केले जाते. यात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज घेतले जातात. त्यामुळे DRI सध्या याकडे लक्ष देऊन आहे. काहीच दिवसांपूर्वी नोएडातून एका नायजेरियन म्होरक्याला पकडण्यात यश आले होते. तर आता आणखी एका महिलेला या संदर्भात पकडण्यात यश मिळाले आहे. ड्रग्जची तस्करी करण्यासाठी या महिलेने जे काही डोके वापरले आणि ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. कारण या महिलेने चक्क ब्रा आणि तिच्या केसांच्या वीगमधून ड्रग्ज आणले होते.

युंगाडा या देशाचे नागरिकत्व असलेली ही महिला मुंबईत पकडण्यात आली आहे. तिने तिच्या ब्राच्या पॅडमध्ये आणि केसांना वापरलेल्या विशिष्ट वीगमध्ये ड्रग्ज लपवून आणल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार या महिलेला पकडल्यानंतर तिच्या ब्रापॅडमध्ये आणि केसांच्या वीगला काढल्यानंतर त्यामध्ये तब्बल 8 कोटी रुपयांचे कोकेन हाती लागले आहे. सध्या या महिलेला कस्टडीमध्ये ठेवण्यात आलेले आहे.

गेल्या काही DRI ड्रग्जचे सिंडिकेट मोडून पाडण्यासाठी काम करत आहे. या आधीही ड्रग्जची देवाण घेवाण सुरु होती. DRI ने दिलेल्या माहितीनुसार मॉश्चरायझर, दारु, सॅनिटरी पॅड अशांतून ड्रग्ज आणले जात होते. वेगवेगळ्या शक्कल लढवत पॅडलर ड्रग्ज देशात आणतात. अशावेळी त्यांना पकडण्यासाठी आणि देशाला ड्रग्जपासून मुक्त करण्यासाठी DRI नेहमीच प्रयत्नशील असल्याचे दिसते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *