clove for weight loss

Spice For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी फक्त व्यायामच नाही तर आपल्या स्वयंपाकघरात असलेल्या काही मसाल्यांचे सेवन देखील खूप प्रभावी ठरते. लवंग हा असाच एक मसाला आहे ज्यामध्ये लठ्ठपणा विरोधी लढण्याची ताकद आहे. आपल्या आहारात त्याचा समावेश कशा पद्धतीने करावा आणि त्याचा कसा फायदा करून घ्यावा हे आपण या लेखातून पाहूया. 

लठ्ठपणा ही एक अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. शरीरात विविध ठिकाणी अतिरिक्त चरबी जमा होते आणि शक्य तितक्या लवकर यापासून मुक्त होणे आवश्यक आहे, कारण यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्ट्रॉलचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. लठ्ठपणा हा केवळ अनुवांशिक आणि वैद्यकीय परिस्थितीचा परिणाम नाही तर खराब जीवनशैलीचा परिणाम आहे. अशा परिस्थितीत यापासून सुटका मिळवण्यात आहार महत्त्वाची भूमिका बजावतो.

आपल्या स्वयंपाकघरातील अनेक मसाले स्वादासह औषधीय गुणांनी युक्त आहेत. यामधील लवंग ही लठ्ठपणा कमी करण्यास उपयुक्त ठरते. NCBI मध्ये प्रकाशित उंदरांवर करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, लवंगेच्या अर्काच्या सेवनाने वजनावर नियंत्रण मिळवता येते आणि याशिवाय पोटाच्या आसपास निर्माण झालेली चरबी कमी करण्यास मदत मिळते. (फोटो सौजन्य – iStock) 

लवंगेचे पाणी प्या

लवंगांचे पाणी तुमच्या शरीरातील चरबी कमी करण्यास उपयुक्त ठरू शकते. हे तयार करण्यासाठी, काही अख्ख्या लवंगा पाण्यामध्ये घाला आणि रात्रभर हे पाणी तसंच ठेवा. त्यानंतर सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करा. असे केल्याने शरीरातील चयापचय प्रक्रिया वाढते ज्यामुळे कॅलरी जलद बर्न होतात आणि वजन कमी होऊ लागते.

(वाचा – Weight Loss Mistakes | वजन कमी करताना टाळा या चुका)

चहामध्ये लवंग टाका

३-४ लवंग गरम पाण्यात 5-10 मिनिटे उकळवून लवंग चहा तयार करा. हा चहा तुम्ही दिवसातून एकदा नियमितपणे सेवन करू शकता. हे पचन सुधारण्यास, भूक कमी करण्यास आणि चयापचय वाढविण्यास मदत करते. यामुळे पोटावरील चरबी कमी होण्यास मदत मिळते. 

मसाल्यामध्ये लवंग करा मिक्स 

घरात तयार करण्यात येणाऱ्या मसाल्यांमध्ये तुम्ही लवंग पावडर मिक्स करून त्याचा वापर करू शकता अथवा घरात बनणाऱ्या पदार्थांमध्ये लवंगेचा उपयोग करा. लवंग सूप, स्ट्यू, कढी आणि स्टर फ्राईड पदार्थांमध्ये लवंगेचा स्वाद चांगला येतो आणि त्याशिवाय तुमच्या लठ्ठपणासाठीही याचा फायदा करून घेता येतो. 

(वाचा – जंक फूड खाऊन वाढवले होते परिणिती चोप्राने ‘चमकिला’साठी १५ किलो वजन, कसे केले कमी)

स्मूदीमध्ये लवंग 

तुमच्या आवडत्या स्मूदी रेसिपीमध्ये चिमूटभर लवंग घाला. असे केल्याने तुम्हाला जास्त काळ पोट भरलेले राहण्यास मदत होईल आणि स्मूदीमध्ये वेगळी चव आणताना जास्त खाणे टाळता येईल. नियमित लवंग खाल्ल्याने पोटातील चरबी कमी होईल. 

कुकिंग ऑईलमध्ये लवंग 

अख्ख्या लवंगा ऑलिव्ह ऑईल किंवा खोबरेल तेलात मंद आचेवर भाजून लवंगाचे तेल बनवा. हे सुगंधी तेल स्वयंपाक करण्यासाठी किंवा सॅलड्स आणि भाज्यांवर रिमझिम करण्यासाठी वापरा जेणेकरून चव वाढेल आणि चरबी कमी करण्यास मदत मिळेल. 

टीप: प्रिय वाचक, आमच्या बातम्या वाचल्याबद्दल धन्यवाद. ही बातमी फक्त तुम्हाला माहिती देण्यासाठी लिहिली आहे. हे लिहिताना आम्ही घरगुती उपाय आणि सामान्य माहितीची मदत घेतली आहे. जर तुम्ही तुमच्या आरोग्याशी संबंधित काहीही वाचले असेल तर ते अवलंबण्यापूर्वी नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *