दिनेश फडणीस यांचे निधनदिनेश फडणीस यांचे निधन

CID कार्यक्रमातून घराघऱात पोहोचलेले फ्रेडी अर्थात अभिनेता दिनेश फडणीस यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. मल्टीपल ऑर्गन फेल झाल्यामुळे त्यांचे निधन झाले आहे अशी माहिती समोर आली आहे. ते 57 वर्षांचे होते. लेखक आणि अभिनेता अशी दुहेरी भूमिका त्यांनी कायम साकारली. पण त्यांना खरी ओळख मिळाली ती त्यांच्या CID मधील फ्रेडीक्स या भूमिकेमुळे. त्यांच्या जाण्याने एक चांगला कलाकार इतक्या लवकर गमावल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

CID हा सोनी टीव्हीवर लागणारा कार्यक्रम अगदी घराघरात जाऊन पोहोचला आहे. गेली कित्येक वर्षे या कार्यक्रमाने लोकांना डोळ्यात अंजन घालण्याचे काम केले आहे. यामधील अनेक कलाकार हे प्रसिद्ध झाले आहेत. त्यांची ओळख या कार्यक्रमाने कायम टिकून ठेवली आहे. काहीच वर्षांपूर्वी या मालिकेने निरोप घेतला. पण आजही त्याचे जुने एपिसोड्स हे दाखवले जातात. यातील प्रत्येक कलाकाराने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यापैकीच एक म्हणजे ‘फ्रेडिक्स’ त्यांनी या मालिकेत तब्बल 20 वर्ष काम केले आहे. हिंदी चित्रपटातही त्यांनी काम केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून फ्रेडिक्स यांची प्रकृती अस्वस्थ होती. त्यांचा औषधोपचार देखील सुरु होता. पण त्याच्या औषधाचा परिणाम हा त्यांच्या इतर अवयवांवर होत होता हे काही त्यांना कळले नाही. त्यामुळेच त्यांची प्रकृती बरी होण्याच्या आधीच जास्त खालावत गेली. त्यांच्या जाण्याने सगळ्यांवरच दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *