Piyush Ranade मराठी मालिकांमधील दोन प्रसिद्ध चेहरे आता एकमेकांचे ऑफिशली जोडीदार झाले आहेत. अभिनेता पियुष रानजे आणि सुरुची अडारकर विवाहबंधनात अडकले आहेत. त्यांच्या चाहत्यांसाठी ही धक्कादायक अशी सुखद बातमी असेल. कारण कोणालाही यांच्यात असं काही नातं होतं हे माहीत नसेल. पण त्यांच्या लग्नाच्या फोटोंनी या बातमीवर शिक्कामोर्तब केले आहे. अत्यंत थाटामाटात असा त्यांचा हा लग्नसोहळा पार पडला आहे. हे त्यांच्या फोटोंवरुन दिसत आहे.
सुरुची दिसतेय खूपच सुंदर

सुरुची अडारकर आधीही सुंदर साजिरी समजूतदार अशा रुपात आपण मालिकेत पाहिले आहे. ती मालिकेत जितकी सुंदर दिसते तितकीच ती तिच्या लग्नाच्या साडीतही सुंदर दिसत आहे. तिने पिवळ्या रंगाची साडी नेसली असून साधारण टेंपल प्रकारातील दागिने घातले आहेत. तर पियुषने क्रिम कलरचा कुडता आणि पिवळ्या रंगाचं उपरण घेतलं आहे. ज्यात तो खूपच हँडसम दिसत आहे.सुरुचीने तिच्या सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले आहेत.
पियुषचं तिसरं लग्न
पियुष रानडे याची याआधीही दोन लग्नं झालेली आहेत. हे त्याचे तिसरे लग्न आहे. या आधी तो अभिनेत्री मयुरी वाघसोबत 2017 मध्ये विवाहबंधनात अडकला होता. पण ते लग्न फार काळ टिकलं नाही. त्यानंतर तो बरेच वर्ष सिंगल असल्याचे देखील कळत होते. सुरुचीसोबत तो रिलेशनमध्ये आहे अशी बातमी देखील कुठेही नव्हती असे असताना लग्नाचा फोटो थेट समोर येणे हे अनेकांना तसे सुखद धक्का देणारे आहे. त्यातचं त्याच्या या तिसऱ्या लग्नामुळे पियुषला काही प्रमाणात ट्रोल देखील केलं जात आहे.
पियुष-सुरुचीच्या लग्नातील आणखी खास फोटोज पाहण्याची उत्सुकता आता त्यांच्या चाहत्यांमध्ये आहे.