Bigg Boss Marathi 5 च्या घरात दुसऱ्या आठवड्यातील एलिमिनेशनची तलवार एका आठवड्यापुरती काढण्यात आली आहे. पण तरीदेखील घरातील काही सदस्यांवर ही टांगती तलवार अगदी तशीच आहे. घरात दोन गट स्पष्ट झाले असून एका ठिकाणी शक्ती, उर्मटपणा आणि दुसऱ्या ठिकाणी युक्ती, संस्कृती असे पारडे जड असताना दिसत आहे. घरातील काही सदस्यांबद्दल आता प्रेक्षकांचीही काही मते तयार झाली असून काही सेलिब्रिटींना त्यात चांगलेच ट्रोल केेले जात आहे. यामध्ये प्रामुख्याने निकी तांबोळी, जान्हवी किल्लेकर, वैभव चव्हाण(Vaibhav Chavan), अरबाज पटेल यांच्या नावाचा समावेश आहे. पडद्यावर डॅशिंग दिसणारा वैभव चव्हाण (Vaibhav Chavan) काहीतरी वेगळं करेल अशी अपेक्षा असताना त्याने मात्र शक्तीची निवड केल्यामुळे तो सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होत आहे. वैभव त्या टीमचे केवळ एक शेपूट असल्याची टीका देखील त्याच्यावर केली जात आहे.
वैभवची निवड चुकली (Vaibhav Chavan)
सध्या घरात असलेल्या दोन गटांपैकी एक गट हा कायम ताकदीचा उपयोग करताना दिसतो. शिवाय अनेकदा कोणाशी कसे वागावे याचे भानही त्यांना भान राहिलेले नाही. या घरात अनेक ज्येष्ठ कलाकार आहेत त्यांचा योग्य तो सन्मान केला जात नाही असे देखील दिसून आले आहे. जे मराठी इंडस्ट्रीत काम करतात त्यांनी तरी ज्येष्ठ कलाकारांना तितका मान द्यायला हवा असे देखील अनेकांना वाटते. पण असे प्रत्यक्ष घडताना दिसत नाही. अरबाज, निक्की, जान्हवी आणि वैभव कोणत्याही ठोस कारणांशिवाय केवळ अरेरावीची भाषा वापरत ज्येष्ठांना टार्गेट करत असल्याचे दिसून आले आहे. वैभव सारख्या कलाकाराने योग्य बाजू निवडायला हवी होती, असे देखील अनेकांनी लिहिले आहे. नुकतेच घरात त्याचे इरिनाशी मैत्रीपूर्ण संबंंध दिसून आले आहेत. तिच्या बाजूने बोलताना खरे- खोटे जाणून न घेता तो अरेरावी करताना दिसला आहे. त्यामुळे वैभव हा चुकतोय असे अनेकांना वाटू लागले आहे.
छोटा पुढारी म्हणजे डबल ढोलकी
घरात असलेला छोटा पुढारी अर्थात घन:श्याम दरोडे हा देखील केवळ चुकीच्या बाजूने बोलताना दिसत आहे. दुसऱ्यांचा अपमान करणे, चुकीच्या बाजूने बोलणे, अरेरावी करताना तो दिसून आला आहे. खेळ हा योग्य बाजूने खेळायला हवा याचा त्याला विसर पडला आहे. संख्याबळ आणि शक्ती जिथे जास्त आहे असे त्याला वाटते अशा ठिकाणी तो झुकताना दिसत आहे.
अरबाजला मिळायला हवा एक दट्टा
जान्हवीची कानउघडणी केल्यानंतर आता अरबाजलाही असाच एक दट्टा मिळावा अशी अपेक्षा आहे. पण रितेश भाऊच्या धक्क्यावर अनेकदा म्हणावी तितकी कानउघडणी करताना दिसत नाही. अगदी पहिल्या टास्कपासून अरबाज हा चिडीचा डाव खेळताना दिसत असूनही त्याला त्याबद्दल बोलले जात नाही. त्याच्या वागण्यात कोणताही बदल झालेला दिसत नाही. प्रत्येक टास्क हा केवळ आणि केवळ गोंधळ घालून आणि शक्ती दाखवून खेळताना तो दिसला आहे. असे असूनही त्याला रितेश का बोलत नाही असाही प्रश्न आहे.
घरात वैभवने शक्तीची बाजू न निवडता दुसऱ्या गटात खेळला असता तर तो शेपूट न दिसता या घरात स्टार दिसला असता यात कोणतीही शंका नाही.