रितेशने घेतली निक्कीची शाळारितेशने घेतली निक्कीची शाळा

Bigg Boss Marathi 5 चा पहिला भाऊचा धक्का झाला आहे. रितेश देशमुखने(Riteish Deshmukh) पहिल्याच आठवड्यात अनेकांची कानउघडणी केलेली आहे. तर काही जणांना खेळासाठी जागे होण्याची गरज असल्याचे देखील सांगितले आहे. पहिला आठवडा गाजवलेल्या निक्कीला तर रितेशने असा काही धक्का दिला आहे. त्यामुळे या पुढे या घरात तिला वावरताना मराठीचा मान ठेवून राहावे लागणार आहे. इतकेच नाही तर तिला या पुढे बोलतानाही खूप विचार करावा लागणार आहे. कारण हिंदी बिग बॉसमध्ये सलमाननंतर आता निक्कीची गाठ रितेेशची पडलेली आहे. नेमकं काय झालं चला घेऊया जाणून

मराठीचा अपमान…..

निक्की तांबोळीने (Nikki Tamboli) या आधी हिंदी बिग बॉस केले आहे. तिची खेळाची जिद्द ही कितीही चांगली असली तरी ती या मध्ये अनेकदा चुकीच्या गोष्टी करुन बसते हे खूप जणांनी आधीच पाहिले आहे. आताही मराठीचा अपमान करणे, कलाकारांचा अपमान करणे, एखाद्याच्या मागे हात धुवून लागणे, अपशब्दांचा वापर करणे अशा काही मोठ्या चुका तिच्याकडून झालेल्या आहेत. ज्या पाहिल्यानंतर अनेक जण शनिवारी काय होणार? याची वाट पाहात होते. रितेश हिला काही समज देतो की नाही? हे अनेकांना पाहायचे होते. शनिवारी वीकेंडची सुरुवातच रितेशने निक्कीपासून केली. तिने तिच्या खेळाची तारीफ केली असली तरी तिने जे काही चुकीचे केले आहे त्यासाठी आरसा देखील दाखवला आहे. घरातील ज्येष्ठ कलाकारांसोबत वागताना नीट वागणे किती गरजेचे आहे हे देखील तो सांगायला विसरला नाही. मराठी लोकांची मेंटलिटी काढणाऱ्या निक्कीला समस्त मराठी लोकांची माफी मागायलाही रितेशने सांगितले.

Bigg Boss Marathi 5 : पहिल्याच दिवशी ज्येष्ठ अभिनेत्रीमुळे घरात राडा

अंकिताही दिला सल्ला

कोकणहार्टेड गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली अंकिता प्रभू वालावलकर आणि निक्की यांच्यातही वाद झालेला दिसून आला आहे. पण मराठी लोकं असं करत नाही म्हणत तिने निक्कीसाठीही काही शब्द वापरले जे रितेशला मुळीच पटले नाही. मराठीपणा हा असा दाखवण्यापेक्षा शक्तीचा उपयोग करता येत नसेल तर गनिमी कावा करुन करावा असा सल्ला देखील अंकिताला त्याने दिला. घरातील मुद्दयावर योग्यवेळी योग्य निर्णय घ्यावा असा सल्ला देखील अंकिताला देण्यात आला.

सूरजला दिले बळ

या घरात आल्यापासून अनेकांनी गुलीगत अर्थात सूरजला थोडेसे वाळीत टाकले आहे. काही कलाकार त्याला काहीच समजत नाही असे समजून एकटे पाडताना दिसत आहे. हे लक्षात आल्यामुळेच बिग बॉसने सूरजला समजावून त्याला चांगलेच बळ दिले आहे. शिवाय त्याला सेव्ह करुन तो ही या सेलिब्रिटींमध्ये तितकाच महत्वाचा हे देखील दाखवून दिले आहे.

पहिलाच भाऊचा धक्का तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *