गुलीगत धोका पडेल का सगळ्यांवर भारी

Bigg Boss Marathi 5 च्या अनेक वेगवेगळे सेलिब्रिटी आलेले आहेत. त्या सगळ्यांची आपली अशी एक खासियत आहे. पण या घरात गेल्यानंतर काही सेलिब्रिटींमध्ये नक्कीच तुलना केली जाते. गावाहून आलेल्या कलाकारांना लगेचच सगळ्यात मिसळणं तसं थोडं कठीण होऊन बसतं. लॉकडाऊनच्या काळामध्ये गाजलेला गुलीगत अर्थात रिलस्टार सूरज चव्हाण (Suraj Chavan) याला या घरात मिळत जुळत घेणं थोडं कठीण होत आहे असे दिसत आहे. म्हणूनच घरातील काही सदस्यांनी त्याला पहिल्याच दिवशी निर्णय घेण्यास अपात्र ठरवून थोडी वेगळी वागणूक दिली आहे. पण म्हणतात ना गुलीगत धोका! त्याला हलक्यात घेणं खूपच जास्त महाग पडू शकते, हे देखील अनेकांनी लक्षात घ्यायला हवे.

पहिल्याच दिवशी ज्येष्ठ अभिनेत्रीमुळे घरात राडा

निर्णय घेण्यास अपात्र

घरात पहिल्याच दिवशी बिग बॉसने काही निर्णय न घेऊ शकणाऱ्या सदस्यांची निवड करण्यास सांगितली. यामध्ये इरिना, सूरज, धनंजय यांची संपूर्ण घरातील लोकांनी निवड केली. इरिनाला आधीच भाषेची समस्या आहे. तर सूरज हा थोडासा आधीच घाबरलेला असल्यामुळे त्याला अजून खेळ आणि लोकं समजण्यास थोडा वेळ जाणार असे दिसत आहे. पण याचा अर्थ त्याला निर्णय घेता येणार नाही असे होत नाही. सध्या त्याच्या लुकमुळे त्याला अशी वागणूक दिली जात आहे. अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटताना दिसत आहे. इतकेच नाही. तर हा रिल स्टार काही साधा नाही त्याला हलक्यात घेऊ नका असे देखील अनेक जण म्हणत आहे. त्याने आपला खेळ अद्याप सुरु केलेला नाही. त्याला आल्या आल्या अशी वागणूक दिल्यामुळे त्याच्या चाहत्यांना त्याचा राग देखील आलेला दिसत आहे.

इरिनावर होतोय अन्याय

इरिना या घरात एकमेव परदेशी सदस्य आहे. तिला भाषा येत अली तरी देखील तिला तितक्या पटकन आपली मते मांडता येत नाही. तिला मतं मांडताना खूप वेळा इंग्रजीचा आधार घ्यावा लागतो. या आधीही बिग बॉसच्या घरात परदेशी कलाकार आलेले आहेत. त्या सगळ्यांना उत्तम वागणूक दिली जाते. त्यांना सगळ्याच गोष्टींमध्ये थोडीफार सूट दिली जाते. पण या सीझनमध्ये तसे होताना दिसत नाही. ती काही वेळा काही निर्णयाच्या वेळी चिडताना देखील दिसली आहे.

या #weekendvaar मध्ये तिच्यामुळे कोणाकोणाला फटका बसेल? शिवाय गुलीगतसाठी रितेश काय बोलेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *