Bigg Boss 17 च्या ग्रँड प्रिमिअरला सुरुवात झाली आहे. यंदा वेगळ्या अंदाजात हा रिॲलिटी शो सुरु झाला आहे. सलमानच्या दमदार परफॉर्मन्स नंतर आता स्पर्धकांची ओळख करुन देण्यास सुरुवात झाली आहे. यंदाचे घरही खास आहे. यात तीन मकान पाहायला मिळणार आहे. यातील पहिले मकान हे प्रेमाचे, दुसरे मकान हे बुद्धीचे असणार आणि मकान तीसरे असणार आहे शक्तीचे. चला जाणून घेऊया ही स्पर्धकांची यादी
मनारा चोप्रा

मनारा चोप्रा ही या घरात जाणारी पहिली स्पर्धक आहे. प्रियांका चोप्रा, परिणिती चोप्रा यांच्या घरातील ही एक आहे. त्यामुळे आधीच तिच्याकडे फेम आहे. तिची हल्लीच एक कॉन्ट्राव्हर्सी झाली होती. तिच्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने तिला सगळ्यांमसोर गालावर किस केले होते. त्यामुळे तिचा तो व्हिडिओ वायरल झाला होता. आता या घरात तिचा हा हॉटनेस किती टिकू शकतो ते पाहावे लागणार आहे.
मुनावर फारुकी

घरातील दुसरा स्पर्धक आहे कॉमेडिअन मुनावर फारुकी. लॉक अप सीझन 1 चा विजेता असलेला मुनावर हा स्टँडअप कॉमेडिअन आहे. कॉमेडिअन सोबत तो एक रॅपर देखील आहे. हिंदू देवतांचा अपमान केल्यामुळे त्याला 2021 साली मध्य प्रदेश पोलिसांनी अटक केली होती. त्याच्यावर 2020 साली हल्ला देखील झाला होता. ज्याचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला होता
ऐश्वर्या शर्मा आणि नील भट

bb17 च्या घरात एका जोडीची एंट्रीदेखील झाली आहे. यातील ऐश्वर्या शर्माला अनेकांनी खतरो कें खिलाडीच्या या सीझनमध्ये पाहिले असेल. टीव्ही अभिनेत्री असलेली ऐश्वर्याने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. तर नील भट्ट हा देखील अभिेनेता असून त्याने मालिकांमध्ये काम केले आहे. एका दमदार एनर्जीत त्यांनी घरात एंट्री केली आहे.
नाविद सोल

नावेद सोल हा फार्म्सीस्ट असून तो एक इंटरनॅशनल पर्सनॅलिटी आहे. गेल्या सीझनमध्ये अब्दूने धमाल केली होती. आता या सीझनमध्ये नावेद मजा आणेल असे दिसत आहे. युके आणि पर्शियाचे कॉम्बिनेशन असलेला नाविद हा बॉलिवूडचा फॅन आहे असे देखील दिसत आहे
अनुराग ढोबाल

या घरातील 6 वा कंटेस्टंट आहे मोटर बाईक राईडर आणि व्लॉगर अनुराग ढोबाल. देवभूमी उत्तराखंडामधील ही पर्सनॅलिटी असून तो सोशल मीडियावर बाबूभैया या नावाने प्रसिद्ध आहे. त्याच्याकडे असलेले बाईक कलेक्शन एकदम खास आहे. त्याचा कंटेट हा लोकांना चांगलाच आवडतो. आता या घरात त्याचा स्पीड कसा असेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सना रईस खान

BB17 च्या घरातील पुढील सदस्य आहे सना रईस खान. ही पेशाने वकील आहे. तिने अनेक गुन्हेगारांना सोडवले आहे. आता तिचा हा प्रवास कसा असणार आहे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
जिग्ना वोरा

क्राईम रिपोर्टर जी स्वत: एक ब्रेकिंग न्यूज बनली. तिची खरी गोष्ट आजही कोणाला माहीत नाही. कोणतेही कारण नसताना तिने भोगलेला कारावास आणि त्याची कहाणी तिच्या तोंडून नक्कीच ऐकायला मिळेल अशी अपेक्षा आहे. जिग्नावर एक सीरिज आली ज्यात करिश्मा तन्नाने तिची भूमिका साकारली.
अंकिता लोखंडे – विकी जैन

टीव्हीवरील सुप्रसिद्ध चेहरा अंकिता लोखंडे आणि तिचा नवरा विकी जैन हे देखील यंदाच्या स्पर्धेत आहेत. त्यांच्या नावाची चर्चा फार आधीपासून होत होती. आता त्यावर मोहर बसली आहे. अंकिता लोखंडे ही दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड होती. तिचे विकीशी लग्न जुळल्यानंतरही सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर त्याला पाठिंबा देण्यासाठी ती पुढे आली होती. त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली.
सोनिया बन्सल

BB 17 चा घरातील 11 वा सदस्य आहे सोनिया बन्सल. ही एक मॉडेल आणि अभिनेत्री असून तिने अनेक देश फिरले आहे. तिला फिरण्याची आवड आहे. राहुल रॉय आणि शक्ती कपूर यांचा ‘100 करोड’ या चित्रपटातून तिने डेब्यू केला. तिने अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले आहे.
खानजादी

घरातील 12 वा सदस्य आहे. फिरोजा खान म्हणजेच खानजादी. ही आसामची असून ती एक गायिका, रॅपर आहे. रॅपर शो हसलमध्ये ती दिसली होती. यात तिला चांगली प्रसिद्ध मिळाली होती.
सनी आर्या

तहलका नावाने युट्युबवर प्रसिद्ध असलेला हा चेहरा. प्रँक करण्यासाठी प्रसिद्ध आहे. हरयाणाचा हा प्रसिद्ध चेहरा सगळ्यांना हसवेल की डोक्याला ताप देईल हे पाहावे लागणार आहे. युट्युबवर यांचे अनेक चाहते आहेत. आता या घरात त्याच्या या खुराफती चालतात का हे पाहावे लागेल.
रिंकू धवन

14 वी सदस्य आहे रिंकू धवन. 90 च्या दशकात अनेक हिंदी चित्रपटात रिंकूने भूमिका साकारल्या आहेत. मालिकांमधूनही तिने काम केले आहे. रिंकू धवन ही मराठी अभिनेता किरण करमरकरची पत्नी आहे. सोशल मीडियावर ती फार ॲक्टिव्ह नसली तरी ती एक ओळखीचा चेहरा आहे. तिने स्क्रिनवर अनेक वेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.
अरुण माशाट्टी

युट्युबवरील हा गेमर आहे. अचानक भयानक हे डायलॉग मारुन तो सगळ्यांचे एंटरटेन्मेंट करतो. त्याच्या बोलण्यात एक वेगळाच लहेजा आहे. पण तो फार मजेशीर सध्यातरी वाटत आहे. पण त्यांच्यासोबत पंगा घेणे सगळ्यांना भारी पडणार आहे
अभिषेक कुमार आणि आएशा मालविया

बिग बॉसच्या घरातील 16 वा स्पर्धक आहे अभिनेता अभिषेक कुमार. टीव्हीवरील हा चेहरा चांगलाच प्रसिद्ध असून त्याचा चांगलाच फॅनफॉलोविंगदेखील आहे. त्याच्यासोबत एकाच सीरिअलमध्ये दिसलेली आएशा मालविया ही देखील एकत्र एंट्री करत आहे. हे दोघे आल्या आल्या स्टेजवरच भांडू लागले. त्याच्यामध्ये काहीतरी होतं. पण आता त्यांच्यात असे काही आहे असे दिसत नाही. आता घरात यांची केमिस्ट्री कशी असेल ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हे आहेत यंदाचे स्पर्धक. उद्यापासून सुरु होईल खरा खेळ.