हल्लीच्या काळात मसाज किंवा स्पा हे आपल्या सगळ्यांसाठीच फॅड झाले आहे. आता कितीही चांगली सेंटर्स उभारली गेली तरी त्या मागील फायदे हे आपण विसरता कामा नये. महिन्यातून एकदा तरी चांगल्या मसूस कडून मसाज करणे हे आरोग्यासाठी फारच फायद्याचे असते. जर तुम्ही मसाज करत नसाल तर तुम्हाला मसाज करण्याचे फायदे माहीत असायला हवेत. चला जाणून घेऊया मसाज करण्याचे फायदे (Benefits Of Massage)
मसाज करण्याचे अफलातून फायदे
- मसाज केल्यामुळे रक्ताभिसरण क्रिया सुधारते. शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत मिळतो.
- वजन कमी करण्यासही मसाज मदत करते. म्हणूनच डिलीव्हरी झाल्यानंतर शरीराचा आकार पूर्ववत करण्यासाठी मसाज केला जातो.
- ज्यांना रोजच्या रोज व्यायाम करणे शक्य नाही अशांनी जर मसाज केला तर त्यांचे शरीर अधिक चांगले राहण्यास मदत मिळते.
- वृद्धांना या वयात व्यायाम करणे शक्य नसते अशावेळी जर त्यांनी मसाज केला तर त्यांचे शरीर अधिक चांगली राहण्यास मदत मिळते.
- ज्यावेळी आपण मसाज करतो त्यावेळी आपल्या त्वचेला त्याचा अधिक लाभ होतो. त्वचा तजेलदार आणि चिरतरुण राहण्यास ही मदत मिळते.
- हल्लीचे कामाचे स्वरुप पाहता खूप जणांना स्ट्रेस आणि ताण असतो. तो ताण कमी करण्यासाठी मदत मिळते.
- अनिद्राचा ज्यांना त्रास आहे अशांनी मसाज केला तर त्यांना चांगली झोप लागण्यास मदत मिळते.
- मसाजमुळे चांगली झोप लागते त्यामुळे शरीर ताजेतवाने होण्यास मदत मिळते.
मसाजचे फायदे लक्षात घेऊन महिन्यातून एकदा तरी मसाज अवश्य करा.