आंगणेवाडीची जत्राआंगणेवाडीची जत्रा

Anganewadi Jatra कोकणवासियांसाठी आंगेणावाडीची जत्रा ही नेहमीच खास असते. या जत्रेला विविध ठिकाणाहून लाखो भाविक येतात. गेल्या काही वर्षांपासून या जत्रेला चांगलंच ग्लॅमरस असा लुक आला आहे. नव्या वर्षात जत्रेला जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. कारण येत्या 22 मार्च रोजी ही जत्रा भरणार आहे असे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे तुम्हाला जायचे असेल तर तुम्ही आताच यासाठीचे प्लॅनिंग करा.

कोकण हे प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते. येथील सिंधुदूर्ग जिल्ह्यात मसुरे नावाचे एक गाव आहे. या गावात आंगणेवाडी नावाची एक वाडी आहे. (प्रत्येक गावात एक वाडी असते) त्यांची देवी भराडी देवी. तिला या ठिकाणी बरीच मान्यता आहे. भरडावर देवी प्रसन्न झाली म्हणून तिला भराडी देवी असे म्हणतात. भराड अर्थात माळरान. माळरानावर प्रकटलेली देवी म्हणून ती भराडी देवी. या देवीच्या दर्शनासाठी देशा-परदेशातून लोक येतात.

पूर्वी ही देवी केवळ आंगणे कुटुंबियांची होती. परंतु ती देवी नवसाला पावते. अशी तिची ख्याती असल्यामुळे आजुबाजूच्या गावातील लोकंही तिथे श्रद्धेने येऊ लागली. त्यामुळेच याला मोठे असे स्वरुप प्राप्त झाले. या जत्रेची तारीखही खास पद्धतीने ठरवली जाते. देवी ज्या तारखेला कौल देते त्या तारखेला येथे जत्रा भरते. त्यामुळे ठराविक अशी तिथी किंवा सण धरुन ही जत्रा अजिबात येत नाही.

आता ज्यांना Anganewadi Jatra करायची आहे त्यांनी आताच तयारीला लागा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *