शमा स्पा सेंटरवर धाडशमा स्पा सेंटरवर धाड

Thane News कोणत्याही स्पा सेंटरला भेट देताना अतिशय काळजी घेण्याची आजही गरज असल्याचे सिद्ध झाले आहे. ठाण्यातील नौपाडा येथे असलेल्या एका स्पा सेंटरमध्ये अशाच प्रकारे अवैध देहविक्रीचा धंदा सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी जेव्हा या स्पावर धाड टाकली. त्यावेळी येथून दोन मुलींना रेस्क्यू करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यात या स्पाच्या मॅनेजरला देखील अटक करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. परंतु या संदर्भातील संपूर्ण माहिती अद्याप पोलिसांनी दिलेली नाही.

ठाण्यातील नौपाडा या परिसरात शमा नावाचे एक ब्युटी पार्लर आणि स्पा सेंटर आहे. या स्पा संदर्भात काही टीप पोलिसांच्या हाती लागली होती. याची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी एक फेक क्लायंट बनवून या ठिकाणी पाठवला. त्यावेळी या ठिकाणी खरंच हा धंदा सुरु असल्याचे कळले. पोलिसांनी धाड टाकली त्यावेळी तेथून 2 मुलींना रेस्क्यू करण्यात आले. तर त्यावेळी कॅश काऊंटरवर असलेल्या स्टाफला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *