राखी सावंतला नाही बोलावले अनंत अंबानीच्या प्री वेडिंग कार्यक्रमांनाराखी सावंतला नाही बोलावले अनंत अंबानीच्या प्री वेडिंग कार्यक्रमांना

Anant Ambani Wedding च्या प्री वेडिंग सोहळ्याचा थाट आपण सगळ्यांनीच अनुभवला. या लग्नाच्या प्री वेडिंग कार्यक्रमासाठी खूप जण दुरून आले होते. कोणता सेलिब्रिटी या कार्यक्रमाला नव्हता असे अजिबात नाही. परंतु या लग्नाच्या प्री वेडिंगच्या कार्यक्रमासाठी राखी सावंत (Rakhi Sawant) ला बोलावण्यात आले नव्हते. याची खंत तिने आता बोलून दाखवली आहे. अंबानींच्या या लग्नाच्या कार्यक्रमात मला बोलावलं असतं तर मी काय काय केलं असतं याचा एक व्हिडिओ तिने पोस्ट केला आहे. त्यावर अनेकांनी कमेंट केली.

#Deepveer येत्या सप्टेंबरमध्ये होणार आई-बाबा,म्हणून असे फोटो करत होती पोस्ट

राखीला नाही बोलावले Anant Ambani Wedding

लग्नाच्या या थाटात कोणाला बोलावले आणि कोणाला नाही याची कोणालाच जाणीव झाली नव्हती. पण राखीने हा व्हिडिओ केल्यानंतर मात्र हे लक्षात आले की, राखीला खरंच या कार्यक्रमांसाठी बोलावण्यात आले नव्हते. हॉलिवूड, बॉलिवूड, टॉलिवूड असे सगळे सेलिब्रिटी असताना ही ड्रामाक्वीन आली नाही हे सगळ्यांच्याच लक्षात आले. रिहाना या व्हिडिओमध्ये विचारतेय की मला काही बोलावलं, रिहानाला बोलावलं आणि मी इतके काम केले आहे की, मला का नाही बोलावण्यात आलं. मी आले असते तर चांगले उंची कपडे घालून आले असते असे देखील तिने म्हणायला कमी केले नाही.

आदिलनंतर थोडी दुरावलीच

https://www.instagram.com/reel/C4Kb4YfBAa6/?utm_source=ig_web_copy_link

मध्यंतरी #biggboss मध्ये आल्यानंतर तिने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. कारण त्यामध्ये ती खरी कशी आहे तशी वागत होती. म्हणून ती लोकांच्या पसंतीस उतरली होती. परंतु जे काही तिने आदिलनंतर केले त्यानंतर तिच्यावर परत एकदा संशय आलाच. त्यामुळेच तिची प्रसिद्धी कमी झाली आणि लोकांनी ती आवडेनाशी झाली. पूर्वी ज्या प्रमाणे मिडिया तिच्याभोवती फिरायचा तसा आता गराडा पाहायला मिळत नाही.

आता तुम्हीच सांगा राखी सावंतला का नाही बोलावलं असेल ते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *