आवळ्याचं लोणचंआवळ्याचं लोणचं

Amla Achar At Home या पूर्वी तुम्ही अनेक ठिकाणी पाहिला असेल किंवा विकत घेऊन खाल्ला असेल. पण आज आपण झटपट असे आवळ्याचे लोणचे घरीच कसे बनवायचे आणि तेही अगदी 15 मिनिटात ते आज आपण पाहणार आहोत. व्हिटॅमिन C ने युक्त असलेले आवळे हे अनेक गोष्टींसाठी फायद्याचे असतात. पोटाचे आरोग्य, केसांचे आरोग्य आणि सुंदर त्वचा यासाठी आवळा हा खायला हवा. हल्ली बाजारात वर्षभर आवळे मिळतात. परंतु हिवाळ्याच्या दिवसात आपल्याला बाजारात खूप आवळे येतात. त्यामुळे या दिवसात तरी हे लोणचं तुम्ही नक्की गरम गरम वरण, भातासोबत खायला हवे. त्यामुळे तुमच्या तोंडी एक छान चवही रेंगाळेल.

आवळ्याचे फायदे

आवळा हा गुणकारी आहे हे आपण सारेच जाणतो. आवळ्याचे काही फायदे असे आहेत जे आपल्याला माहीत नसतील तर ते आजच माहीत करुन घ्या म्हणजे तुम्हाला त्याचे फायदे मिळवण्यास नक्कीच मदत होईल.

  1. आवळा पोटाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. आवळ्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.
  2. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आवळा मदत करते. म्हणून तुम्ही आवळा खायला हवा.
  3. आवळ्याच्या सेवनामुळे त्वचा आणि केस सुंदर होतात. त्यांना एक छान चमक मिळते.
  4. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी आवळा लाभदायी ठरतो.
  5. जर सर्दी पडसे यामुळे तोंडाची चव गेली तर ती परत येण्यासाठीही आवळा मदत करते.

असे बनवा झटपट आवळ्याचे लोणचं

आता वळूयात मस्त अशा आवळ्याच्या लोणच्याच्या रेसिपीकडे

  1. बाजारातून टपोरे मोठे असे आवळे आणून ते स्वच्छ धुवून, पुसून घ्या.
  2. आवळ्याच्या उभ्या फोडी करा. बियांकडील भागाकडूनही गर काढून घ्या.
  3. एका कढईत थोडे जास्तीचे तेल गरम करुन त्यामध्ये आवळ्याच्या फोडी टाका. त्यांचा रंग बदलेपर्यंत एक मध्यम आचेवर ते परता. ते खूप परतणार नाही याची काळजी घ्या.
  4. आता एका बाजूला लोणच्याचा तयार मसाला घ्या. अन्यथा तुम्ही लोणच्याचा मसालाही झटपट करु शकता. त्यासाठी 2 मोठे चमचे अख्खे धणे,2 मोठे चमचे जीरे, मोहरी, गूळ , 1/4 चमचा मेथी दाणे,मीठ चवीनुसार
  5. सगळे एका पॅनमध्ये ड्राय रोस्ट करुन घ्या. थंड झाल्यावर त्याची जाडसर पूड करुन घ्या
  6. तेलातील आवळे थंड झाले असतील तर त्यामध्ये तयार केलेला लोणच्याचा मसाला घाला. चवीनुसार मीठ, लाल तिखट आणि गूळ घालून सगळे साहित्य एकत्र करुन घ्या.
  7. काचेची एक बरणी घेेऊन तिला थोडे गरम करुन कोरडे करुन घ्या. त्यात तयार लोणचे ठेवा. बरणीचे झाकण बंद करुन दोन ते तीन दिवस मुरु द्या.
  8. तुमचे आवळ्याचे मस्त लोणचे तयार

ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला लोणच्याचा हा प्रकार नक्की आवेडल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *