uday samant

आरोग्य, सामाजिक, पत्रकारिता आणि सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना अल्फा कम्युनिकेशनतर्फे अल्फा अवॉर्ड 2023 पुरस्कार देण्यात येतात. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित सोहळ्यास उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात  आले.

आपल्या कारकीर्दीची सुरूवात रत्नागिरीतील ग्रामीण भागात आरोग्य सुविधा देण्यापासून झाली. कोरोना काळात डॅाकटर, नर्स, वैद्यकीय सेवक यांनी देवदूतांप्रमाणे काम करून देशातील जनतेची सेवा करण्याचे महान काम केले. वैद्यकीय मदत वंचित घटकापर्यंत पोहचवावी असे आवाहन उद्योगमंत्री श्री. सामंत यांनी केले.

या वर्षी दिवाळीत इरशाळवाडीतील दुर्घटनाग्रस्तांसोबत होतो. डॉ. राजेंद्र गवई यांचे काम उल्लेखनीय आहे. त्यांच्या कामास मंत्री श्री. सामंत यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी मनन वासा, सायरस गोंदा, फादर फरानसिस स्वामी, उरविजा भातकुली  इत्यादींना पुरस्कार देण्यात आला. यावेळी डॉ.राजेंद्र गवई, पद्मश्री डॉ. विकास महात्मे, डॉ.किशोर मसुरकर, डॉ. विवेक मेंडोसा आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *