आपल्या अभिनय, सौंदर्य आणि नृत्याने चाहत्यांच्या हृदयावर थेट वार करणारी अभिनेत्री अमृता खानविलकर अर्थात सर्वांची आवडती चंद्रा नेहमीच आपले स्टायलिश फोटो शेअर करत असते. नुकतीच अमृताने संजय लीला भन्साळी यांच्या ‘हिरामंडी’ चित्रपटाच्या प्रिमियरला हजेरी लावली. मराठमोळ्या अमृताच्या स्टाईलने यावेळी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
गोल्डन एम्ब्रॉयडरी असणाऱ्या ऑफव्हाईट साडीमध्ये अमृताने सर्वांच्या नजरा वेधल्या. संपूर्ण बॉलीवूड अवतरले असताना अमृताने आपला वेगळेपणा यावेळी दाखवून दिला. पाहा चंद्राच्या कांजीवरम साडीतील या खास अदा (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
अमृताने गोल्डन एम्ब्रॉयडरी असणारी ऑफव्हाईट रंगाची कांजीवरम परिधान केली होती आणि या साडीत ती अत्यंत सुंदर, आकर्षक आणि क्लासी दिसून येत आहे. कुंदन आणि मोत्यांचे कॉम्बिनेशन असणारे दागिने अमृताने यावेळी घातले होते. चोकर, हातात बांगडी, अंगठी आणि नोजपिन असा लुक तिने यास साडीसह केल्याचे दिसून आले. मेस्सी बन हेअरस्टाईल करत तिने या साडीसाठी परफेक्ट लुक केलाय. अमृताचा हा लुक तुम्हीही कॅरी करू शकता. कोणत्याही कार्यक्रमासाठी असा लुक तुम्हाला अधिक अट्रॅक्टिव्ह लुक देऊ शकतो. विंग्ड आयलायनर लावत तिने डोळ्यांना अधिक आकर्षक बनवले आहे. अमृताने आपले मोठे डोळे डार्क काजळ, विंग्ड आयलानर आणि आयलॅशने अधिक सुंदर केलेत. ग्लॉसी मेकअप करत तिने फायनल टच दिलाय. फाऊंडेशन, गोल्डन हायलायटर, आयशॅडो आणि त्यासह गुलाबी शेड लिपस्टिकचा टच अप करत अमृताने आपला हा साडी लुक पूर्ण केलाय.