Sayaji Shinde Health News

Sayaji Shinde Health News: प्रसिद्ध अभिनेता सयाजी शिंदे यांना छातीत दुखायला लागल्यानंतर त्वरीत रूग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यानंतर त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आल्याचे आता समोर आले आहे. सयाजी शिंदे यांनी स्वतः सोशल मीडियावर याबाबत व्हिडिओ शेअर करत याची माहिती दिली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून सयाजी शिंदे यांची तब्बेत खराब होती. ११ एप्रिल रोजी अचानक तब्बेत खराब झाल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आणि तिथेच अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. काही टेस्ट केल्यानंतर त्यांच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये ९९% ब्लॉकेज असल्याचे समोर आले आणि त्यानंतर ऑपरेशन करण्यात आले. (फोटो सौजन्य – @sayaji_shinde Instagram/iStock)

कधी भेटावे डॉक्टरांना 

सध्या असे प्रकार वरचेवर दिसून येत आहेत. त्यामुळे तुम्हाला सतत छातीत दुखत असेल वा जळजळ होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांना भेटा. तुम्हाला यामुळे अनेक गंभीर आजारही निर्माण होऊ शकतात. कोणत्या परिस्थितीत तुम्ही दुर्लक्ष करू नये हे जाणून घ्या. 

( वाचा – Parkinson day: पार्किन्सन्स रोगाची लक्षणे आणि त्याचे टप्पे)

छातीत दुखण्याची कारणे 

छातीत दुखण्याची अनेक कारणं असू शकतात. अनेकदा हे दुखणं जोरात असू शकते तर कधी कधी अगदी सौम्य कळाही येऊ शकतात. पण तुम्हाला हे सतत जाणवत असेल तर तुम्ही चुकूनही याकडे दुर्लक्ष करू नका. कारण तसं केल्यास तुमच्या जीवावर बेतू शकते. 

  • हार्ट अटॅक
  • एन्जाईना
  • रक्तपुरवठा न होणे 
  • पेरिफेरल वॅस्क्युलर डिसीज 
  • एओर्टिक एन्युरिज्म 
  • कार्डिओमायोपॅथी 

सर्व हृदयाशी संबंधित समस्या ज्यामध्ये हार्ट ब्लॉकेज, ब्लड सर्क्युलेशन अथवा हार्ट मसल्सचा त्रास आहे, ते अधिक गंभीर होते. 

याशिवाय अपचन, निमोनिया, ब्लड क्लॉट, फुफ्फुसांच्या आसपास सूज येणे, पॅनिक अटॅक, छातीत जळजळ, पोटात दुखणे यामुळेही छातीत दुखू शकते. 

(वाचा – Indian Food | तुम्हीही हे चमचमीत पदार्थ खाता आवडीने? मग थांबा हे पदार्थ आरोग्यास हानिकारक)

ही लक्षणे दिसताच भेटा डॉक्टरांना 

छातीत दुखत असल्यास काही महत्त्वाची लक्षणे दिसतात तेव्हा त्वरीत डॉक्टरांना भेटावे अन्यथा परिस्थिती गंभीर होऊ शकते. 

  • शिंकताना वा खोकताना छातीत दुखणे 
  • छातीच्या डाव्या बाजूला अथवा फुफ्फुसाच्या खाली दुखणे चालू असेल
  • श्वास घेण्यास त्रास 
  • छातीत सतत जळजळ
  • २० मिनिट्सपेक्षा अधिक छातीत दुखत असल्यास 
  • जळजळ होऊन सतत उलट्या होणे
  • २ आठवडे छातीत जळजळ होत असून औषधानेही फरक पडत नसल्यास
  • जेवत असताना छातीत दुखल्यासारखे वाटणे 

संदर्भ

https://www.mayoclinic.org/diseases-conditions/chest-pain/symptoms-causes/syc-20370838

https://my.clevelandclinic.org/health/symptoms/21209-chest-pain

https://www.webmd.com/pain-management/whats-causing-my-chest-pain

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *