Jaundice Symptoms काविळ हा आजार आपल्या सगळ्यांना परिचित आहे. हल्लीच्या काळात कावीळने अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे काविळ या आजाराविषयी आपण अधिक माहिती घेणे फारच जास्त गरजेचे आहे. कावीळ ही एका कारणाने होत नाही. त्यामागेही काही कारणं असतात. त्यामुळे तुम्हाला याची कारणं आणि त्यावर काय करायला हवे हे देखील माहीत असायला हवे. चला जाणून घेऊया या आजाराविषयी अधिक
How To Get Over Mental Stress | मानसिक तणावातून असे व्हा मुक्त
Stomach Bloting | सतत होतंय का ब्लोटींग, तर मग एकदा वाचाच
कावीळ म्हणजे काय? | Jaundice Symptoms
काविळ म्हणजे पिवळेपणा. साधारण डोळ्यांमधून आपल्याला कावीळ झाली की नाही हे कळते. डोळ्यांचा रंग अचानकपणे पिवळा झाला तर सगळ्यात आधी हा अंदाज काढला जातो. यामध्ये प्रामुख्याने लघवी, डोळे, भूक मंदावणे, अंग दुखणे, उलट्या अशी काही प्राथमिक लक्षणे जाणवू लागतात. त्याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका. कारण ते पुढे जाऊन आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते.
कावीळ कशी होते?
कावीळ होण्यामागेही काही कारणे असतात. तुम्हाला नेमकी कशामुळे कावीळ झाली याचा अंदाज तुमच्या चाचणीतून येतोच. परंतु साधारणपणे कावीळ ही जंतूसंसर्गामुळे होते ज्यामध्ये तुमच्या यकृताला सूज येते. अतिसूक्ष्म जीवाणूच्या प्रादूर्भावामुळे कावीळ होऊ शकते.
दूषित अन्न हे देखील कावीळसाठी कारणीभूत ठरु शकते. चांगले अन्न पोटात जाणे गरजेचे असते. कधी कधी आपल्या शरीरात दूषित अन्न गेले तरी देखील कावीळ होऊ शकते.
रक्तातून देखील कावीळ होते. त्याचे निदान कऱण्यासाठी रक्ततपासणी करावी लागते. त्यानंतर त्याचे निदान होऊ शकते.
घाबरण्याचे कारण म्हणजे कावीळ आपल्या शरीरात ही अधिक काळासाठी राहू शकते. ती जर निदान न करता राहिली तर त्यामुळे यकृतावर ताण येऊन यकृताचा आजार होण्याची शक्यता असते. म्हणून कावीळला घाबरणेही तितकेच गरजेचे आहे.
कावीळ होण्यामागे काही कारणं
कावीळ होण्यामागे काही कारणेही असतात. त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. जर तुम्ही दारुचे मोठ्याप्रमाणात सेवन करत असाल तर त्यामुळेही तुमच्या यकृताला सूज येऊन कावीळ होण्याची शक्यता असते.
काही औषधे ही देखील तुमच्या यकृतावर परिणाम करत असतात. त्यामुळे कोणती औषधे तुमच्या यकृतावर परिणाम करतात ते जाणून घ्या.
तर काही जणांना जन्मत:च हा आजार होतो. त्याचे निदान झाल्यानंतर योग्य काळजी घेणे गरजेचे असते.
जर तुम्हाला असे काही जाणवतं असेल तर योग्यवेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यावर उपाय करणे गरजेचे आहे.