इंडिगो एअरलाईन्सवर संतापला सिद्धार्थ जाधवइंडिगो एअरलाईन्सवर संतापला सिद्धार्थ जाधव

Indigo Airline संदर्भात अनेकदा तक्रारी येत असतात. सगळ्यात जास्त इकोनॉमी फ्लाईट घेऊन जाणारी इंडिगो अनेकांच्या मन:स्तापाचे कारण बनली आहे. अस्वच्छ फ्लाईट, सततचा उशीर आणि सामानाचे नुकसान असे कायम या एअर लाईन्सच्या बाबतीत होते. आता आपला लाडका मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) याला देखील असाच काहीसा अनुभव आला आहे. तो Indigo Airline वर चिडला असून त्याने त्या संदर्भातील एक व्हिडिओदेखील पोस्ट केला आहे. नेमंक काय झालं सिद्धार्थसोबत चला घेऊया जाणून

… आणि संतापला सिद्धार्थ

अभिनेता सिद्धार्थ जाधव Indigo Airline ने मुंबई ते गोवा प्रवास करत होता.त्याची एक बॅग लगेजमध्ये होती. ज्यावेळी तो गोव्याला आला त्यावेळी त्याची बॅग त्याने ताब्यात घेतली. परंतु त्याची बॅग सुस्थितीत नसल्याचे त्याच्या लक्षात आले आणि त्याने लगेचच व्हिडिओ करायला घेतला. त्याने म्हटले की, Indigo Airline ने माझी बॅग चांगलीत हँडल विथ केअर केली आहे. बॅगेचे हँडल तितके शाबुत आहे,असे सांगत त्याने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्याने रागारागात व्हिडिओ शेअर केलेला नाही तर शहाण्याला शब्दाचा मार पुरेसा असतो असे जाणून घेत त्यांनी हा मेसेज शेअर केला आहे.

मराठी- हिंदीत नाव

सिद्धार्थ जाधव हा आता केवळ मराठी प्रेक्षकांसाठीच अभिनेता राहिला नाही. त्याने हिंदी चित्रपटातही उत्तम कामगिरी केली आहे. त्याने साकारलेले छोटे रोल का असेना अनेकांना आजही चांगले लक्षात आहेत. नुकताच तो ‘लग्नकल्लोळ’ या चित्रपटात झळकला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *