Lord Shri Ram Names यावर आज आपण अधिक माहिती घेणार आहोत. प्रभू श्री राम हे मर्यादापुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या पराक्रमाविषयी आपण सगळेच जाणतो. अयोध्येचा राजा पण तरीही आपल्या वडिलांची आज्ञा म्हणून 14 वर्षे वनवासात राहिला. त्यानंतर घडलेले ‘रामायण’ हे देखील अनेकांना माहीत आहे. हिंदू धर्मात रामायणाचे अनन्यसाधारण असे महत्व आहे. अशा प्रभू श्री रामांवरुन जर तुम्हाला मुलाचे नाव ठेवायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत. ही नावे तुम्हाला नक्कीच आवडतील.
श्रीरामांची पौराणिक नावे
लंकापती रावणाचा अहंकाराला तोडणाऱ्या प्रभू रामचंद्राची गोष्ट आपण सगळेच जाणतो. सत्याची वाट कधीही न सोडणारे प्रभू राम एक आदर्श असे व्यक्तिमत्व होते.
| मुलांची नावे | नावांचे अर्थ |
| श्रीराम | सदा आनंद देणारा |
| रामभद्र | पवित्र असा |
| रामचंद्र | चंद्रासारखा शांत |
| राजीवलोचन | कमळासारखे डोळे असलेला |
| राजेंद्र | राजांचा राजा |
| जितमित्र | शत्रूंचा संहार करणारा |
| विश्वामित्रप्रिय | विश्वामित्रांच्या अत्यंत आवडीचा |
| वाग्मिने | बोलणारा |
| सत्यवाचे | कायम सत्य बोलणारा |
| कौसलेय | राणी कौसल्येचा पूत्र |
मुलांसाठी श्री रामाची लेटेस्ट नावे Lord Shri Ram Names
प्रभू श्री रामंचद्रांची नावे कदाचित तुम्हाला थोडी जुनी वाटतील. पण रामांची काही अशी नावे आहेत जी तुम्हाला या काळतही खूप आवडतील अशी आहेत. तुमच्या बाळाचे आद्याक्षर जर यापैकी एक आले असेल तर तुम्ही हे नाव ठेवू शकता.
| मुलांची नावे | नावांचे अर्थ |
| सौम्य | अत्यंत शांत, कोमल असा |
| आदिपुरुष | आधीपासून असलेला |
| राघव | रघुकुळात जन्माला आलेला |
| ब्रम्हज्ञ | सगळ्या ब्रम्हांडाचे ज्ञान असलेला असा |
| धन्विन | सूर्याच्या किरणांपासून तयार झालेला, तेजस्वी |
| शाश्वत | अंतिम सत्य |
| वेदात्म | वेदाचा सर्वस्वी असा आत्मा |
| जैत्राय | विजय मिळवणारा असा |
| पराक्ष | तेजपुंज असा, तेजस्वी |
| परस्म | सगळ्यात पुढे असलेला |
तुम्हालाही ही माहिती आवडली असेल तर तुम्ही नक्की शेअर करा.
