ira khan weddingira khan wedding

Ira Khan आमिर खानची लेक लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. मराठमोळ्या नुपूर शिखरेशी ती लग्नगाठ बांधणार आहे. गेल्या काही दिवसांपासून आयरा तिच्या केळवणीचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहे. आता मराठमोळ्या मुलाशी लग्न करतेय तर तिला मराठी यायलाच हवे. म्हणून तिने खासन नुपूरसाठी उखाणेही घेतले आहेत. जे सोशल मीडियावर अनेकांच्या पसंतीस उतरले आहे. आता तिच्या लगीनघाईला सुरुवात झाली असून घरातील इतर मंडळी यांनीही मराठमोळा पेहराव करुन अनेकांची मनं जिंकली आहेत. नऊवारी साडी… कपाळावर टिकली अशा लुकमध्ये आयराची आई रिना दत्ता आणि किरण राव दिसले आहेत. जाणून घेऊया या लग्नाविषयी अधिक

Amruta Fadnavis | ट्रोल केले तरीही कधीही मागे हटत नाहीत अमृता फडणवीस

आयराचा राजेशाही विवाहसोहळा

आयराचा 3 जानेवारी रोजी रजिस्टर पद्धतीने विवाह होणार आहे. सगळ्यात आधी ताजमध्ये काही खास लोकांच्या उपस्थितीत एक पार्टी होणार आहे. त्यानंतर येत्या 8 तारखेला तिचा शाही सोहळा हा राजस्थान येथे मोठ्या थाटामाटात केला जाणार आहे. त्याचीच तयारी सध्या सुरु आहे. लगीन घरात वेगवेगळ्या कार्यक्रमांना सुरुवात झाली असून अगदी मराठमोळ्या थाटात तिचे कुटुंबातील काही सदस्य दिसत आहे. यासाठी किरण राव आणि रिना दत्ता यांनी नऊवारी नेसली होती. नुपूरच्या घरी ते मराठमोळ्या थाटात आलेले सगळ्यांनीच पाहिले आहे.

केळवण आणि मज्जा

अगदी मराठमोळ्यापद्धतीत आयरा आणि नुपूरने केळवणाची मजा घेतली आहे. त्यांच्या कुटुंबियांनी खास त्यांच्यासाठी केळवणाचे आयोजन केले होते. त्या केळवणाच्या दिवशीही अगदी सुंदर साडी, डोक्यावर टिकली आणि उखाणा घेत या होणाऱ्या नवरा-बायकोंनी एकमेकांना घास भरवला आहे. त्यांच्या केळवणाच्या वेळी आयराने छान उखाणा देखील घेतला आहे. आमिर मराठी उत्तम बोलतो. परंतु आयरादेखील मराठी बोलण्यास शिकत आहे.

कसा असेल लुक

सध्या काही विधी पाहता हा लग्नसोहळा मराठमोळा असेल असे वाटत आहे. यापूर्वी त्यांचा साखरपुड्याचा कार्यक्रम झाला होता. त्यावेळी त्यांनी ख्रिश्चनपद्धतीने साखरपुडा केला. तिने लाल रंगाचा ऑफशोल्डर गाऊन घातला होता तर त्याने छान ब्लेझर घातला होता. आता त्यांचा लग्नातील लुक कसा असेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आता या लग्नाचे फोटो आणि लुक कसे असतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *