श्रेयस तळपदेला आला ह्रदयविकाराचा झटकाश्रेयस तळपदेला आला ह्रदयविकाराचा झटका

Shreyas Talpade ला प्रकृति अस्वस्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याला हार्ट अटॅक आल्याचे निदान झाले आहे. त्याची ही बातमी वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे अनेकांना धक्का देखील बसला. त्याला तातडीने अंधेरीच्या बेलेव्ह्यू रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्याच्यावर अँजिओप्लास्टी झाल्याचे कळत आहे. सध्या श्रेयस हिंदी चित्रपट ‘वेलकम टू जंगल’ हा चित्रपट करत आहे. या चित्रपटाच्या शुटींगवरुन घरी परतल्यानंतरच त्याला हा त्रास सुरु झाला. सुदैवाने त्याची प्रकृति आता स्थिर असल्याची माहिती त्याच्या पत्नीने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

सध्या ‘वेलकम टू जंगल’या मल्टीस्टारर चित्रपटाचे शुटींग सुरु आहे. या चित्रपटाचे शूट करुन श्रेयस घरी आला. शूटवर असे पर्यंत त्याला कोणताही त्रास झाला नाही. तो अगदी नीट होता. त्याने सगळे सीन आणि शॉट्स अगदी व्यवस्थित दिले. तो घरी आल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्याने लगेचच पत्नीला सांगितले. ती त्याला तातडीने रुग्णालयात घेऊन आली. पण वाटेतच त्याला ह्रदयविकाराचा झटका आला. रुग्णालयात त्याच्यावर ॲंजिओप्लास्टी करण्यात आली. त्यामुळे आता तो सुखरुप आहे. अशी बातमी त्याच्या पत्नीने दिली आहे. तिने चाहत्यांना धन्यवाद म्हटले आहे. शिवाय त्याची प्रकृती सुधारत असल्याचे देखील सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *