झिम्मा 2 ला प्रेक्षकांची पसंती

मराठी चित्रपटही उत्तम चालतात हे आपण गेल्या काही वर्षांपासून पाहतोय. मराठी चित्रपट आता बदलतोय याचे उत्तम उदाहरण म्हणजे हेमंत ढोेमेचा ‘झिम्मा’ महिलांना घेऊन असा मजेदार चित्रपट असू शकतो जो प्रत्येकीच्या डोळ्यात अंजन घालेल असे कधीही वाटले नव्हते. पण या चित्रपटाने ती जाणीव करुन दिली. इतकेच नाही तर ‘झिम्मा 2’ ही प्रेक्षकांना तितकाच आवडत आहे. मराठी आणि अमराठी प्रेक्षकांमध्येही या चित्रपटाची चर्चा आहे. त्यामुळे हा चित्रपट आता बॉलिवूडच्या चित्रपटांनाही टक्कर देत आहे.

चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या भरभरून प्रेमाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, ” खूप छान वाटतेय. एवढा उदंड, भरभरून प्रतिसाद मिळेल, असे खरोखर वाटले नाही. प्रेक्षक आपले खास दिवस ‘झिम्मा २’बघून साजरे करत आहेत. 2-3 वेळा चित्रपट पाहायला आलेले प्रेक्षकही अनेक आहेत. खूप छान वाटतेय. खरंतर ‘झिम्मा 2’ला प्रेक्षक कसे स्वीकारतील, याबद्दल मनात जरा भीतीच होती. कारण ‘झिम्मा’ला प्रेक्षकांनी खूप मोठे केले होते. त्यामुळे हा चित्रपटाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतील, प्रेक्षकांना हा आवडेल का, असे अनेक प्रश्न मनात होते. शिवाय ‘झिम्मा 2’ सोबत बॉलिवूडचे काही मोठे सिनेमेही प्रदर्शित झाले आहेत. त्यामुळे जरा दडपण होते. परंतु आता दोन आठवडे झाले आहेत. प्रेक्षक आजही ‘झिम्मा २’ला पसंती देत आहेत. या चित्रपटांसोबत ‘झिम्मा 2’ स्पर्धा करतोय आणि हे भारी फीलिंग आहे. आपला चित्रपट यशस्वी दुसरा आठवड्यानंतर आता तिसऱ्या आठवड्यात पदार्पण करत आहोत. शोजही वाढले आहेत. त्यामुळे आशा आहे, हा आठवडाही असाच हाऊसफुल्ल जाईल. अर्थात हे सगळे यश माझ्या एकट्याचे नसून संपूर्ण टीमचे आहे. आनंद एल. राय, क्षिती जोग आणि जिओ स्टुडिओजची साथ लाभल्यानेच आम्ही हा पल्ला गाठू शकलो.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *