रयत शिक्षण संस्थेत शिकणाऱ्या मुलींना महाराष्ट्र नर्सिंग कॉन्सिलची परवानगी मिळावी- युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाणरयत शिक्षण संस्थेत शिकणाऱ्या मुलींना महाराष्ट्र नर्सिंग कॉन्सिलची परवानगी मिळावी- युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण

सातारा येथील रयत शिक्षण संस्था ही विद्यार्थांच्या हिताचा विचार करणारी संस्था आहे. या संस्थेत शिकणाऱ्या मुलींना महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची परवानगी मिळण्याबाबत संबंधितांना निर्देश द्यावेत, असे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना दिले.

सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात सुरू करण्यात आलेल्या (2019 ) बॅचलर ऑफ व्होकेशनल स्टडीज नर्सिग हा डिग्री कोर्स सुरू करण्यात आला. या कोर्सला युजीसीची मान्यता मिळाली, परंतु महाराष्ट्र नर्सिंग कॉन्सिलची परवानगी नसल्याने मुलींना नोंदणी करता येत नाही. त्यामुळे मुलींना नोकरीसाठी अडचणी निर्माण होत आहेत असेही सुरज चव्हाण यांनी निवेदनात म्हटले आहे.

यावेळी निवेदन सादर करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे रणजित नरुटे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *