अजिबात घेऊ नका गिफ्टसअजिबात घेऊ नका गिफ्टस

Worst Gift Ideas | एखाद्याला भेटवस्तू द्यायची असेल खूप जणांना काय द्यावे हा प्रश्न पडतो. मग काय तुमच्या आमच्यासारखे अनेक जण गुगलचा आधार घेतात. गुगल जे सांगेल ते गिफ्टस आपण घेतो. पण इतरांना देताना काय द्यायला नको याचा आपण कधीच विचार करत नाही. भेटवस्तू देताना काही गोष्टी या देणे अजिबात चांगले मानले जात नाही किंवा ते देणे एखाद्याच्या भावना दुखावण्यासारखे असते हे तुम्हाला माहीत आहे का? जर तुम्हालाही माहीत नसेल ही यादी तर आजचा लेख खास तुमच्यासाठी आहे. काहीही झाले तरी तुमच्या जवळची व्यक्ति असो किंवा दूरची तुम्ही चुकूनही त्यांना हे 10 गिफ्टस देऊ नका.

Benefits Of eating Almonds | बदाम खाण्याचे 10 फायदे तुम्हाला माहीत आहेत का

अजिबात देऊ नका हे गिफ्टस | Worst Gift Ideas

काही गोष्टी अशा असतात ज्या तुम्ही कोणाला गिफ्ट म्हणून देणे चांगले मानले जात नाही किंवा अशा गोष्टी देणे मुळात चांगले सुद्धा नाही. आम्ही अशा काही गोष्टींची यादी केली आहे जी वाचल्यानंतर तुम्हाला ते नक्की पटेल.

  1. Gift Card : हल्ली सगळ्याच मोठ्या दुकानांनी गिफ्ट कार्ड द्यायला सुरुवात केली आहे. तुम्हाला हवी असलेली रक्कम तुम्ही त्यामध्ये भरु शकता. पण तुम्ही एखाद्याला फारच लहान रकमेचे गिफ्ट कार्ड देत असाल तर ते अजिबात चांगले वाटत नाही. जर एखाद्याला काही वस्तू देण्याचा बजेट कमी असेल तर तुम्ही अशा पद्धतीचे गिफ्ट कार्ड घेऊ नका. कारण अनेकदा तुम्ही ज्याला हे देत आहात त्याला त्याचा अधिकचा पैसा त्यात घालावा लागतो.
  2. Personal Care : खूप जण महिलांना कॉस्मेटिक्स देणं अधिक पसंत करतात. पण जो पर्यंत समोरची व्यक्ती त्यासाठी विचारात नाही किंवा सांगत नाही तोपर्यंत तुम्ही या गोष्टी भेट म्हणून त्यांना देता कामा नये. उदा. पिंपल केअर किट वगैरे गोष्टी या खूप नकारात्मक संदेश देतात.
  3. Cleaning supplies : खूप जण उपयोगी पडतील अशा वस्तू देण्याचा विचार करतात. पण असे अजिबात करु नका. कारण त्यामुळे तुम्ही एखाद्याच्या खासगी गोष्टीत फार लक्ष देता असे होईल.
  4. Regifted Item : खूप जणांना सवय असते. एखाद्याने दिलेले गिफ्ट पुन्हा दुसऱ्याला देण्याची. ही गिफ्ट सरकवण्याची सवय तुम्ही सोडायला हवी. असे गिफ्टस तुम्ही कोणालाच देता कामा नये.
  5. Intimate Clothing : खूप जणांना खासगी अशा गिफ्टस देण्याची सवय असते. पण कधीही कोणाला इनरवेअर किंवा काही आतले कपटे गिफ्ट स्वरुपात देणे चांगले नाही.
  6. Anti-aging Products : कोणालाही त्याच्या वयावरुन बोलणे हे कधीही चांगले नाही. त्यात जर तुम्ही त्यांना Anti-aging Products प्रोडक्टस दिलेत तर ते त्यांना उगाचच चुकीचा संदेश देणारे ठरतात. त्यामुळे असे गिफ्टस अजिबात देऊ नका.
  7. Work-Related : गिफ्ट हे त्या व्यक्तिला अनुसरुन देण्याची गोष्ट असते. जर तुम्ही सतत केवळ कामाला उपयोगी पडेल असा विचार करुन त्याला गिफ्ट देऊ नका. त्या व्यक्तिला त्याची खरीच गरज असेल त्याने ती बोलून दाखवली असेल तर ही गोष्ट ठिक आहे.
  8. Pet Related Gift: एखाद्याच्या घरी पाळीव प्राणी आहे त्याचा विचार करुन तुम्ही काही देत असाल तर असे देखील करु नका. कारण असेही चांगले नाही.
  9. Religious Gift : देवी देवतांचे फोटो, मूर्ती किंवा तुम्हाला आवडत असलेला अध्यात्मिक गिफ्ट देणे शक्य तो टाळा. कारण खूप जणांना असे गिफ्ट्स आवडत नाही. शिवाय ते ठेवणेही खूप जणांना नको असते.
  10. Workout Related : वर्कआऊटशी संबंधित सामान एखाद्याला अजिबात देऊ नका. ते देखील गिफ्ट म्हणून देणे चांगले नाही.

आता गिफ्ट देताना तुम्ही या गोष्टीचा नक्की विचार करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *