World’s most expensive salt: कुठल्याही खाद्यपदार्थाला खरी चव येते ती मिठाने. रोजच्या घरगुती जेवणापासून ते 5 Star Hotel मध्ये मिळणाऱ्या क्युझिन्सपर्यंत, कुठलाही पदार्थात मीठ पूर्णत्व आणते. ‘स्वादानुसार नमक’ शिवाय खाण्याला मजा नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. थोडक्यात काय तर स्वयंपघरात एखाद-दोन मसाले कमी असले तरी चालतात मात्र मीठ हे हवेच. त्यामुळे गृहिणींच्या घर सामानाच्या यादीतही मीठ प्राधान्यक्रमाने असतेच. मीठाचा बाजारभाव वाढला तर सामान्य माणूस त्रस्त होतो हे खरे पण मीठ खाणं काही सोडत नाही. आज अशाच एका महागड्या मिठाविषयी आपण जाणून घेणार आहोत. हे मीठ जगातील सर्वात महागडे मीठ (world’s most expensive salt) आहे असा दावा केला जातो. इतकंच काय तर याचे अनेक आरोग्यदायी फायदे असल्याचंही तज्ज्ञ सांगतात. आता या मिठाची नेमकी काय बरं स्टोरी आहे, चला जाणून घेऊया…

‘हे’ आहे जगातील सर्वात महागडे मीठ

जागातील सर्वात महागड्या मिठाविषयी आज आपण जाणून घेत आहोत. या मिठाचं नाव आहे- ‘ॲमेथिस्ट बांबू सॉल्ट’ (Amethyst bamboo salt) जगातील हे सर्वात महागडे मीठ कोरियामध्ये बनवले जाते आणि हे बनवण्याची प्रक्रियाही तितकीच खास आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हे मीठ तयार करण्याची प्रक्रिया खूपच वेळखाऊ असून, हे मीठ उत्पादन करण्यापासून ते विक्रीपर्यंतची सर्व प्रक्रिया अनेक टप्प्यांपधून जाते. या मिठावर अनेक सायन्टिफिक टेस्ट केल्या जातात. विविध प्रकारे त्याची शुद्धता केली जाते आणि त्यानंतर एक फाईन प्रॉडक्टच्या स्वरुपात हे दर्जेदार मीठ ग्राहकांपर्यंत पोहचवले जाते.

हे मीठ कसे तयार केले जाते?

हे मीठ तयार करण्याची एक खास प्रोसेस आहे. ॲमेथिस्ट बांबू सॉल्ट बनवण्यासाठी बांबूच्या विशिष्ट आकारात कापलेल्या सिलेंडरमध्ये हे मीठ ठेवले जाते. त्यानंतर त्यावर शुद्धीकरणाच्या अनेक प्रक्रिया केल्या जातात. ज्यामुळे त्या मिठाला अनेक आरोग्यदायी गुणधर्म प्राप्त होतात. मिठाचा दर्जा सर्वोत्तम करण्यासाठी त्याच्या विविध चाचण्या देखील केल्या जातात. साधारणत: ५० दिवस चालणाऱ्या प्रक्रियेनंतर आपल्यासमोर येते ते उत्तम दर्जाचे, स्वादाचे आणि महागड्या किंमतीचे ‘ॲमेथिस्ट बांबू सॉल्ट’. हे मीठ ‘पिंक सॉल्ट’ (Pink Salt) किंवा ‘ब्लॅक सॉल्ट’ (Black salt) पेक्षाही खास आणि गुणकारी असल्याचे म्हटले जाते.

या मिठाची किंमत काय?

साधारणपणे आपल्याला ३५ रुपयांपासून ते १०० रुपये प्रति किलो या दराने मीठ मिळते. प्रत्येक कंपनीनुसार आणि मिठाच्या विशिष्ट प्रकारानुसार त्याचा बाजारभाव वेगवेळा असला तरी साधारणत: ३० ते ११० रुपये या दरांतील मीठ रोजच्या वापारसाठी विकत घेत असतो. मात्र ‘ॲमेथिस्ट बांबू सॉल्ट’ ची किंमत हजारोंच्या घरात असते. उपलब्ध माहितीनुसार, या मिठाचे २४० ग्रॅमचे पाकिट साधारणत: 7,000 रुपये किमतीचे असते. जे सर्वसामान्यांसाठी खूपच महाग आहे. खूप कमी लोकच हे मीठ विकत घेतात. काही विशिष्ट वर्गातील लोकांमध्ये या मिठाला खूपच मागणी असल्याचे काही अहवाल सांगतात.

हे मीठ तयार करण्याची वेळखाऊ आणि महागडी प्रक्रिया, त्यामागे लागणारी मेहनत तसंच प्रॉडक्शन कॉस्ट हे सगळंच महाग असल्याकारणाने साहाजिकच या मीठाची किंमतही जास्त आहे. हे मीठ बांबूमधील आरोग्यदायी गुणधर्म शोषून घेत असल्यामुळे हेल्थसाठी फायदेशीर असल्याचा दावा मीठ उत्पादक आणि ते खाणारे करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *