स्टीम घेण्याआधी प्या पाणीस्टीम घेण्याआधी प्या पाणी

आपल्यापैकी अनेक जण मसाज करायला महिन्यातून एकदा तरी जातात. जीमला जाणारे तर अगदी हमखास जीममध्ये जाऊन एकदा तरी मसाज आणि स्टीम घेतात. संपूर्ण शरीराला स्टीम घेण्याचे अनेक फायदे आहेत. या फायद्यामुळेच अनेकदा आपण काय खबरदारी घ्यायची हे विसरतो. कोणतीही क्रिया करण्याआधी आपण काही खबदारी घेणे गरजेचे आहे. जसे की पाण्याशी निगडीत कोणतीही क्रिया करताना पाण्याच्या काही गोष्टी माहीत असायला हव्यात. Steam Bath घेण्यापूर्वी पाणी पिणे हे फारच जास्त गरजेचे असते ते का ते आपण जाणून घेऊया.

का प्यावे पाणी?

जर तुम्ही गरम पाण्याची स्टीम घेण्यासाठी जात असाल तर स्टीम घेण्याआधी तुम्ही एक ग्लास थंड पाणी प्यायला हवे. बॉडी स्टीम घेण्यामध्ये शरीरातील पाणी हे तुम्हाला हायड्रेट करायचे काम करते. त्यामुळे तुम्हाला स्टीम घेतल्यानंतर थकवा येत नाही. शिवाय ज्यावेळी तुम्ही थंड पाण्यात बसता त्यावेळीही तुम्हाला कोमट पाणी प्यायला हवे. त्यामुळे सर्क्युलेशन होण्यास मदत मिळते. त्यामुळे तुम्ही कधीही कोणत्याही हायड्राथेरपी घेताना आधी पाणी नेमके कसे प्यावे किती प्रमाणात घ्यावे ते थेरपीस्टला विचारुन घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *