Anemia हा शरीरातील रक्ताशी निगडीत असा आजार आहे. ज्यावेळी शरीरात लाल रक्तपेशी अर्थात हिमोग्लोबीन कमी होते. त्यावेळी आपल्याला Anemia चा त्रास होऊ लागतो. हिमोग्लोबीन हे एक प्रकारचे प्रोटीन आहे जे तुमच्या शरीराला ऑक्सिजन पुरवण्याचे काम करत असते. जर ते प्रमाण कमी झाले तर आपले शरीर तशी प्रतिक्रिया दाखवण्यास सुरुवात करते. ज्यामुळे थकवा, सतत आजारपण अशी काही लक्षणे जाणवू लागतात जी Anemia ची लक्षणे असतात. आजच्या या लेखात आपण Anemiaची थोडक्यात माहिती घेणार आहोत.
ॲनिमियाची लक्षणे कोणती?
तुम्हाला ॲनिमिया झालेला असू शकतो हे तुम्हाला दिसणाऱ्या काही लक्षणांवरुन कळू शकते. म्हणूनच सगळ्यात आधी आपण याची लक्षणे जाणून घेऊयात.
- थकवा: शरीराला रक्तपुरवठा सुरळीत झाला की, उर्जा मिळते. त्यामुळे तुम्ही तुमची सगळी कामे अगदी नियमित करु शकता. पण ॲनिमिया असलेल्या लोकांमध्ये रक्तपुरवठा हा अपुरा झालेला असतो. त्यामुळे शरीरात उर्जा खेळती राहण्यासाठी ऑक्सिजनही म्हणावे तितके नसते. त्यामुळेच सतत थकवा जाणवू लागतो.
- त्वचा पांढरी पडणे: प्रत्येकाच्या त्वचेचा रंग हा वेगळा असतो. परंतु ज्यावेळी ॲनिमिया होतो. त्यावेळी तुमची चेहऱ्याची त्वचा ही अधिक पांढरी फटक दिसू लागते. जे अजिबात चांगले नाही. हे देेखील ॲनिमियाचे लक्षण असते.
- श्वास घेण्यास अडथळा: श्वसनक्रिया सुरळीत असेल तर शरीरात योग्य प्रमाणात ऑक्सिजन खेळती राहते. पण ॲनिमिया झालेल्यांमध्ये श्वास घेताना अडचणी निर्माण होतात.
- चक्कर येणे: अचानक उठताना चक्कर येणे हे देखील ॲनिमियाचे एक लक्षण आहे. उठण्याची क्रिया करण्यासाठी मेंदूला संकेत गेला तरी देखील ती क्रिया करताना त्रास होणे हे ॲनिमियाचे लक्षण आहे.
- डोकेदुखी: शरीरात ऑक्सिजनच्या सततच्या कमतरतेमुळे डोकेदुखीचा त्रास होणेही खूपच जास्त स्वाभाविक आहे. जर तुम्हाला ॲनिमिया झाला असेल तर डोकेदुखी वरचेवर होऊ शकते.
- थंडी वाजणे: रक्त ज्याप्रमाणे शरीराला ऑक्सिजन पुरवण्याचे काम करत असतात. अगदी त्याचप्रमाण तुमचे वातावरणापासून संरक्षण करत असतात.
Anemia वरील उपाय
जर तुम्हाला ॲनिमिया झाला आहे याचे योग्य निदान झाले तर तुम्ही काही सोप्या गोष्टींनी काळजी घेऊ शकता. तुमच्या आहारात काही बदल केल्याने तुम्हाला त्याचे फायदे होऊ शकतात.
- ॲनिमियातून बरे होण्यासाठी तुम्ही चांगला आहार घेणे देखील तितकेच गरजेचे आहे. तुमच्या आहारात प्रोटीन, आर्यन असलेल्या पदार्थांचा समावेश करा.
- तुम्हाला होत असलेल्या काही गोष्टींवर योग्य तो सल्ला घ्या. तुम्हाला डॉक्टर काही औषधोपचार देतील त्यानंतरच तुम्हाला आराम मिळण्यास मदत मिळू शकते.
- तुमच्यामध्ये झालेली व्हिटॅमिनची कमतरता भरुन काढण्यासाठी चांगल्या चांगल्या गोष्टींचा आहारात समावेश करा.
ॲनिमिया म्हणजे काय? लक्षणे आणि उपाय कोणते हे जाणून घेतल्यानंतर आरोग्याची काळजी घेण्यास विसरु नका.