Vitamin D From Veg Food या विषयाची माहिती आज आपण खास शाकाहारी लोकांसाठी घेणार आहोत. अनेकदा व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी मांसाहारी पदार्थांची यादी दिली जाते. पण अनेकांना शाकाहारी पदार्थांमधून या सगळ्या गोष्टी मिळवायच्या असतात. अशावेळी शरीरातील व्हिटॅमिन डी वाढवण्यासाठी कोणते पदार्थ खायला हवेत आणि ते कसे मिळते याची सगळी माहिती आज आपण घेणार आहोत.
Nagin | नागिण म्हणजे नक्की काय आणि याची लक्षणे,उपाय, कधी ठरते धोकादायक
व्हिटॅमिन डी हे आपल्याला सूर्यातून मिळते हे माहीत आहे. हल्लीचे लाईफस्टाईल पाहता उन घेण्यासाठीचा वेळ आपल्याकडे नाही. आपण उन घेतोच असेही होत नाही. त्यातच तुम्हाला वाटत असेल की केवळ उन्हातून तुम्हाला ते मिळते हे देखील चुकीचे आहे. तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डी जाण्यासाठी ही ते तुम्ही स्विकारणे गरजेचे असते. पहाटेचे कोवळे उन हेच तुम्हाला व्हिटॅमिन पुरवू शकते. दुपारच्या रणरणत्या उन्हात जर ते घेण्याचा विचार करत असाल तर तो सोडून द्या. कारण असे ते मिळवता येत नाही. त्यामुळे खाद्यपदार्थांमधून जर तुम्हाला ते मिळवता आले तर फारच उत्तम
Vitamin D From Veg Food या शाकाहारी पदार्थांमधून मिळवा व्हिटॅमिन डी
ही यादी परिपूर्ण अशा पदार्थांची तर आहेच पण यातून तुम्हाला मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळेल यात कोणतीही शंका नाही.
- मशरुम्स : विशिष्ट अशा मशरुम्सच्या सेवनामुळे तुम्हाला व्हिटॅमिन डी मिळू शकते.
- दूध : जर तुम्हाला गायीचे किंवा म्हशीचे दूध पिता येत असेल तर त्यातून तुमची गरज पूर्ण होऊ शकते. जर तुम्ही वीगन असाल तर तुम्हाला बदामाचे दूध काढून पिता येईल.
- संत्र्याचा रस : संत्र्याचा रस हा व्हिटॅमिन सी ने युक्त असतो. पण त्यातून तुम्हाला व्हिटॅमिन डी देखील मिळू शकते.
- पनीर किंवा तोफू : दूधापासून बनवण्यात आलेले पनीर किंवा तोफू हे देखील तुम्हाला फायद्याचे ठरु शकतात ते तुम्ही हमखास खायला हवे
- जर खाण्यातून ही गरज पूर्ण होत नसेल तर तुम्ही सप्लिमेंट घेऊन ही तुमच्या शरीराराची गरज भागवू शकता.
आता केवळ नॉन व्हेजपदार्थांमधून नाही तर व्हेज पदार्थांमधूनही तुम्हाला व्हिटॅमिन डीची कमतरता पूर्ण करता येईल.