vidya balan on marraige

45 वर्षीय बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनने 2012 मध्ये चित्रपट निर्माता सिद्धार्थ रॉय कपूरसोबत लग्न केले. आज जवळपास 12 वर्षांनंतरही त्यांच्यात नवविवाहित जोडप्याप्रमाणे प्रेम आणि जिव्हाळा पाहायला मिळतो. तथापि, प्रत्येक नात्याची स्वतःची वैशिष्ट्ये आणि रहस्ये असतात असेही विद्या बालनने एका मुलाखतीमध्ये नुकतेच सांगितले आहे. 

अलीकडेच, इंडिया टुडेशी संवाद साधताना, अभिनेत्रीने तिच्या यशस्वी विवाहामागील कारण उघड केली. विद्याने सांगितले की, लग्न हे दोन व्यक्तींमध्ये असते आणि त्यात तिसऱ्या व्यक्तीला स्थान नसावे. यासोबतच लग्न कार्य करण्यासाठी गोष्टी बोलणे आणि शेअर करणे खूप महत्वाचे आहे. यासोबतच अभिनेत्रीने अशा अनेक गोष्टी सांगितल्या ज्या नवविवाहित जोडप्यांनी लग्न यशस्वी करण्यासाठी नक्कीच लक्षात ठेवल्या पाहिजेत.

पती-पत्नीदरम्यान कुटुंबानेही येऊ नये 

कौटुंबिक माणसं असोत वा मित्र कोणीही दोन व्यक्तींच्या नात्याचा भाग होऊ शकत नाही, असे या अभिनेत्रीचे मत आहे. हे नाकारता येत नाही की विवाहात बहुतेक समस्या तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे उद्भवतात. अशा परिस्थितीत जोडप्यांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की परिस्थिती कोणतीही असो, ते आपल्या नात्यात तिसऱ्या व्यक्तीला येऊ देणार नाहीत.

(वाचा – Divorce Affect Child | या वयात आई-वडिलांचा घटस्फोट ठरतो मुलांसाठी धक्का, मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता)

जोडीदाराशी मोकळेपणाने बोला

आपले मत मांडताना विद्या बालनने म्हटले की, जर आपण आपल्या जोडीदारासोबत प्रत्येक गोष्टीबद्दल मोकळेपणाने बोललो तर ते नाते अधिक घट्ट होण्यासाठी खूप उपयुक्त ठरते. त्यांच्या नात्याचे उदाहरण देताना अभिनेत्रीने स्पष्ट केले की, सिद्धार्थ आणि मी प्रत्येक गोष्टीवर चर्चा करतो, कोणाला वाईट वाटत असेल किंवा राग आला असेल किंवा प्रेम असेल तर ते आम्ही एकमेकांसमोर प्रामाणिकपणे व्यक्त करतो.

(वाचा – Gaslighting | गॅसलायटिंग काय आहे? नात्यावर कसा होतो परिणाम, स्वतःला कसे ठेवाल दूर)

एकमेकांसाठी वेळ काढावा 

जेव्हा दोन व्यक्ती लग्न करतात, तेव्हा या नात्यात येणाऱ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासोबतच एकमेकांसाठी वेळ काढणेही खूप महत्त्वाचे असते. ही एक गोष्ट कोणत्याही किंमतीत दुर्लक्षित करता कामा नये. एकत्र वेळ घालवणे, बोलण्यापासून ते जेवण शेअर करण्यापर्यंत हे निरोगी आणि अत्यंत आनंदाने एकमेकांसाठी करायला हवे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *