श्रिया पिळगावरकरने आपल्या अभिनयाने OTT प्लॅटफॉर्मवर कमालीचा फॅन बेस मिळवला आहे. केवळ सचिन – सुप्रिया या प्रसिद्ध गाजलेल्या जोडीची मुलगी अशी ओळख न राहता तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर सर्वांना आपलेसे केले आहे. तर श्रियाचा फॅशन सेन्सही कमालीचा आहे. सोशल मीडियावर ती आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच पोस्ट शेअर करत असते.
नुकताच श्रियाने आपल्या कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींसह वाढदिवस साजरा केला. तर तिने मरून रंगाच्या क्लासी ड्रेसमध्ये काही फोटो शेअर केले आहेत.. लवकरच तिने OTT वर दोन शो रिलीज होत असून चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. श्रियाचा हा लुक नक्की कसा आहे आणि कशा पद्धतीने फॉलो करता येईल पाहा (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

मरून आणि व्हाईट लेस त्यावर बारीक मोत्यांचे कॉम्बिनेशन असणारी ही स्टाईल श्रियाने खूपच उत्कृष्टरित्या हाताळली आहे. तिच्या या ड्रेसवरून आणि चेहऱ्यावरून नजरच हटत नाहीये.



