साऊथचे सुप्रसिद्ध अभिनेते चंद्र मोहन यांचे निधन झाले आहे. ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले आहे. अशी माहिती समोर येत आहे. मल्लमपल्ली चंद्रमोहन असे त्यांचे नाव असून ते 82 वर्षांचे होते. त्यांनी अनेक चित्रपटांमधून लोकांना हसवण्याचे काम केलेले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांना ह्रदयासंदर्भातील काही तक्रारी होत्या. तेच त्यांच्या मृत्यूचे कारण बनले आहे.
आज सकाळी ९ वाजून 45 मिनिटांनी त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर हैदराबादमधील रुग्णालयात उपचार सुरु होते. पण या उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.
चंद्र मोहन यांनी 900 हून अधिक चित्रपटात काम केले आहे. त्यांच्या विनोदातच त्यांची ओळख होती. आज त्यांच्या जाण्याने एक हरहुन्नरी कलाकार हरपला अशी प्रतिक्रिया उमटत आहे.