पुण्यातील वाफगावचा किल्ला हा दुर्लक्षित होत आहे. या किल्ल्याच्या इतिहास पाहता त्याच्या संवधर्नाची गरज आहे. श्रीमंत मल्हारराव होळकर यांनी हा एकमेव भुईकोट किल्ला आता शिल्लक आहे. होळकरशाहीच्या इतिहासाचे संवंर्धन होणे गरजेचे आहे. यासाठी सरकारकडे आमदार गोपीचंद पडळकर यांनी लिखित स्वरुपात मागणी केली आहे. होळकरशाहीच्या या इतिहासात भटके, विमुक्त, आदिवासी यांचा देखील इतिहास जोडला गेला आहे. त्यांच्या मदतीनेच इंग्रजांना हरवणे शक्य झाले आहे.
राज्यात अनेक किल्ल्यांचे संवंर्धन केले जात आहे. इतिहासाची साक्ष देणाऱ्या या वास्तुंना जपले नाही तर भविष्यात इतिहासातील महत्वपूर्ण गोष्टी पटवून देण्यासाठी आपल्याकडे काहीही उरणार नाही. पुणे जिल्ह्यात असलेला वाफगावचा किल्ला हा राखून ठेवण्यासाठी यशवंतराव होळकरांना आदिवासी, भटके, विमुक्त यांनी मदत करुन 22 वेळा इंग्रजांना हरवले आहे. परंतु आता हा किल्ला रयत शिक्षण संस्थेच्या हाताखाली असल्यामुळे त्याच्याकडे म्हणावे तितके लक्ष दिले जात नाही. याच्या संवर्धनासाठी 10 कोटी रुपयांचा निधी स्थानिक जिल्हाप्रशासनाकडून देण्यात आला आहे. याचा फायदा रयत शिक्षण संस्थेला होईल. किल्ल्याचे संवंर्धन होणार नाही अशी भिती धनगर बांधवांना आहे.
पुढे ते म्हणाले की, ज्याप्रमाणे रायगडचे स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करुन कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात आली त्याच धर्तीवर वाफगावचाही विकास व्हावा. यामाध्यमातून पुरेसा निधी जमा होईल इतकेच काय तर त्यामुळे किल्ल्याचा विकास होणेही सोपे जाईल. येत्या 6 जानेवारीला यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक दिन आहे. त्या दिवशी हा महत्वपूर्ण निर्णय द्यावा अशी विनंती पडळकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे. शिवाय जर सरकारने याला परवानगी दिली नाही तर संपूर्ण धनगर बांधव हे आपल्या निधीतून या किल्ल्याचा जीर्णोद्धार करु इच्छितात असे देखील त्यांनी सांगितले आहे.