वांद्रे शासकीय वसाहतीच्या पुनर्विकासासाठी सविस्तर आराखडा सादर करा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
वांद्रे (पूर्व) येथील शासकीय वसाहतीमध्ये उपलब्ध असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या जागेची क्षमता तपासून त्याठिकाणी पुनर्विकास करण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करुन सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.