दिव्यांगजनांना मिळणार आरक्षण परिपत्रक केले जाहीरदिव्यांगजनांना मिळणार आरक्षण परिपत्रक केले जाहीर

दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियान सुरु आहे . या अभियानादरम्यान दिव्यांग आरक्षणाची अंमलबजावणी होत नसल्याबाबत बऱ्याच तक्रारी शासनाला येत आहेत. त्यामुळे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम , 2016 अधिनियमाच्या कलम 34 प्रमाणे 4 टक्के आरक्षणाची अंमलबजावणी करण्याबाबत दिव्यांग कल्याण विभागाचा शासन परिपत्रक सर्व विभागांना निर्गमित करण्यात आले आहे

नोकरीच्या संदर्भात सदर श्रेणीतील लक्षणीय दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींकडून भरली जाऊ शकतील अशी आस्थापनांमधील पदे नक्की करून कलम 34 मधील तरतूदींप्रमाणे राखीव ठेवावीत .पदे नक्की करण्यासाठी लक्षणीय दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींच्या प्रतिनिधीसह एक तज्ञ समिती स्थापावी.नक्की केलेल्या पदांचा विशिष्ट काळाने निश्चितपणे आढावा घेण्यात यावा , हा कालावधी तीन वर्षांपेक्षा जास्त नसावा

तसेच शासनाची अनेक पदे कंत्राटी तत्त्वावर भरावयाची असून त्यांचे वेतन संबधित शासन विभागाने द्यावयाचे असल्याने कंत्राटी पदांकरीताही उपरोक्त परिच्छेद 3 मध्ये नमूद कार्यवाही संबंधित विभागाने करून त्यानुसार दिव्यांगांसाठी पदे आरक्षित करणे आवश्यक आहे असे परिपत्रकात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *