तिळ खाण्याचे फायदेतिळ खाण्याचे फायदे

Sesame Seeds Benefits चा उपयोग आपण अनेक रेसिपीजमध्ये करतो. तिळापासून खास पदार्थ बनवण्याचीही आपल्याकडे पद्धत आहे. विशेषत: हिवाळ्यात तिळ खाल्ले जातात. हिवाळ्यातील अनेक सणांमधील पदार्थांमध्ये तिळ घातले जातात. त्याचे कारणही खास असते. आपल्या सणांनी बदल्या ऋतुनुसार आहार कसा असावा यात विविधता आणली आहे. त्यामुळेच अनेक पदार्थ आपल्याकडून खाल्ले जातात. आज आपण तिळ खाण्याचे नेमके काय फायदे आहेत ते जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या तिळ खाण्याचे फायदे

  1. तिळ हे न्युट्रिएटंसनी युक्त असतात. यामध्ये फॅट्स, फायबर, व्हिटॅमिन्स असतात जे शरीरासाठी आवश्यक असतात. एक चमचा तिळ जरी रोज चावून खाल्ले तरी देखील त्याचा फायदा होतो.
  2. ह्रदयाचे कार्य सुरळीत चालण्यासाठी शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण योग्य असणे गरजेचे असते. त्यासाठी तिळ मदत करते. त्यात असलेले मॅग्नेशिअम हे ह्रदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते.
  3. तिळामुळे आपल्याला कॅल्शिअम मिळते. ज्यामुळे हाडांना बळकटी मिळण्यास मदत मिळते. लहान असो वा वयस्क तिळ चावून चावून खाल्ले तर हाडं मजबूत होण्यास मदत मिळते.
  4. तिळामध्ये सेसमिन आणि सेसामल नावाचे ॲंटीऑक्सिडंट असते. ज्यामुळे शरीरातील ताण कमी होण्यास मदत मिळते.
  5. तिळामध्ये मोठ्या प्रमाणात आर्यन असते. ज्यांना ॲनिमिया ( Anamia) चा त्रास आहे. त्यांनी याचे सेवन केल्यामुळे नवीन रक्त बनण्यास मदत मिळते. त्यामुळे शरीराला मुबलक प्रमाणात ऑक्सिजन मिळून उर्जा मिळते.
  6. ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांंच्यासाठीही तिळ वरदान आहे. तिळाच्या सेवनामुळे पोट साफ होण्यास मदत मिळते.
  7. शरीराची जळजळ थांबवण्यासाठीही तिळ फारच फायद्याचे ठरते.
  8. तिळामध्ये असलेले zinc आणि व्हिटॅमिन E हे त्वचेसाठी फायद्याचे असते. त्यामुळे त्वचेचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते.
  9. तिळ हे एक प्लांट बेस प्रोटीन आहे. त्याच्या सेवनामुळे तुमच्या शरीरात असलेली प्रोटीनची कमतरता भरुन निघते.
  10. तिळामध्ये अमिनो ॲसिड असते. जे तुमचा मूड चांगला करण्यास मदत करते.

sesame seeds benefits वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटले असेल तर आजच योग्य प्रमाणात तिळाचे सेवन सुरु करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *